शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

चिपळुणातील पाच शाळांचे भाडे थकीत ठेवले

By admin | Updated: September 23, 2014 00:18 IST

२२ लाखाहून अधिक : पालिका सभेत ठरावान्वये शाळांना नोटीस

चिपळूण : नगरपरिषद मालकीच्या असणाऱ्या इमारतीमध्ये जिल्हा परिषदेच्या पाच शाळा सुरु असून, त्यांचे आतापर्यंत २२ लाखाहून अधिक थकीत भाडे येणे आहे. हे भाडे वसूल होण्याच्या दृष्टीने नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत संबंधित शाळांना नोटीस पाठविण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. ३० दिवसांच्या मुदतीत हे भाडे भरण्याची सूचना नगर परिषद प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. मुदतीत हे भाडे वसूल झाले नाही तर शाळांना कुलूप लागण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल पालकवर्गातून केला जात आहे.चिपळूण नगरपरिषद हद्दीत नगरपरिषदेने बांधलेल्या इमारतीमध्ये चिंचनाका शाळा क्र. १, कन्याशाळा चिपळूण, गांधीनगर शाळा, पाग मुलांची शाळा, पेठमाप उर्दू, मराठी शाळा या जिल्हा परिषदेला भाडे तत्त्वावर देण्यात आल्या आहेत. मार्च २०१४ अखेर या शाळांचे अंदाजे २२ लाख रुपये येणे बाकी आहे. याबाबत संबंधित शाळांना थकीत भाडे भरण्याबाबत नगर परिषद प्रशासनाने नोटीस पाठवूनही संबंधित विभाग डोळेझाक करीत असल्याने अखेर हा विषय नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण विशेष सभेत चर्चेला आला. थकीत शाळांचे भाडे वसूल करण्याच्या दृष्टीने तोडगा म्हणून दिवाळी सुटीच्या पूर्वी शाळांनी थकीत भाडे भरावे, असा ठराव सर्वानुमते करण्यात आला. या ठरावाची अंमलबजावणी होण्यासाठी या ५ शाळांना आता ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. थकीत शाळांचे भाडे प्रश्न जिल्हा परिषद शिक्षण विभाग गांभीर्याने घेत नसल्याने या शाळांना कुलूप ठोकण्याची वेळ येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा सवालही पालकवर्गातून केला जात आहे.सध्या जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या हळूहळू कमी होऊ लागली असली तरी सर्वसामान्य कुटुंबातील मुले-मुली याच शाळामध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने थकीत शाळा भाडे दिलेल्या मुदतीत भरण्यासाठी प्रयत्न केल्यास नगर परिषद प्रशासनाची ‘कुलूप बंद’ची कार्यवाही टाळता येईल, असा विश्वास पालकवर्गातून होत आहे. जिल्हापरिषदेने हे थकीत भाडे देण्याचा निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल व गरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घेता येईल. (वार्ताहर)