शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने ५९ लाख लुबाडणारे आणखी पाचजण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 15:01 IST

दोन किलो सोने स्वस्तात देण्याच्या बहाण्याने जंगलात बोलावून ५९ लाख रुपयांची लुबाडणूक केल्याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी ५ संशयितांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देस्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने ५९ लाख लुबाडणारे आणखी पाचजण ताब्यात म्हसळा पोलिसांची कामगिरी, खेड तालुक्यात घडली होती घटना

खेड : दोन किलो सोने स्वस्तात देण्याच्या बहाण्याने जंगलात बोलावून ५९ लाख रुपयांची लुबाडणूक केल्याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी ५ संशयितांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.ही घटना १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील खेड तालुक्यातील उधळे गावच्या हद्दीतील जंगलात घडली होती. दोन किलो सोने केवळ ६० लाख रुपयांना देतो असे आमिष दाखवून वेरळ येथील अमर जड्याळ व अन्य तीनजणांना संशयितांनी उधळे परिसरातील जंगलात बोलावले होते.

या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या सात ते आठजणांनी सोने खरेदी करण्यासाठी गेलेल्या चारही जणांना मारहाण करून दोन बॅगामध्ये असलेली ५९ लाख ६ हजार रुपयांची रोकड पळवून नेली होती. चोरीनंतर हे सर्व चोरटे म्हसळा परिसरात पळून गेल्याची माहिती खेड पोलिसांनी म्हसळा पोलिसांना दिली होती.त्या माहितीच्या आधारे म्हसळा सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. त्यानंतर दरोडा टाकून पळून गेलेल्या संशयितांची माहिती घेऊन तपास सुरू केला.

म्हसळा शहरातील नवानगर परिसरात हे पथक दबा धरून बसले. तसेच वेषांतर करून जवळच्या जंगलात लपून राहिलेल्या संशयितांचा शोध घेतला. अखेर नरेश वसंत चव्हाण, प्रमोद रामचंद्र चव्हाण, दीपक माणिक चव्हाण, विजय गौरीशंकर भगत, अंकुश पंढरीनाथ चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले.याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची संख्या आता ७ झाली आहे. दरम्यान, या आधी ताब्यात घेतलेल्या दोघांना न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अमर जड्याळ याने याबाबत खेड पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करून दस्तुरी येथून विक्रात चव्हाण, तर सुकीवली येथून सिद्देश पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी