शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri news: सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प, अपेक्षित दर नसल्याने मच्छीमार निराश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 12:28 IST

कोकणासह राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता

रत्नागिरी : गेले काही दिवस समुद्र किनारच्या भागात वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे मासेमारी ठप्प झाली आहे. दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढत असल्याने हे मच्छीमार समुद्रात न जाता किनारी नांगरावरच राहणे पसंत करत आहेत.कोकणासह राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून वातावरणात वारंवार बदल होत आहेत. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर, सकाळी आणि सायंकाळी किनारी भागात जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांची अडचण झाली आहे.वाऱ्यामुळे समुद्रात जाण्यासाठी छोट्या फायबर बोटींना इंधन अधिक लागते. त्या तुलनेत मासे मिळत नाहीत. त्यामुळे तोटा सहन करावा लागतो. खर्च करूनही जाळ्यात काहीच मिळत नसल्याने मच्छीमार बंदरावर थांबणेच पसंत करत आहेत. त्यामुळे मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अपेक्षित दर नाहीतमोठ्या मच्छिमारांना बांगडा मिळत असल्याने ७० ते ८० रुपये किलो दर मिळत आहे. तुलनेत गिलनेटने पकडून आणलेल्या बांगड्याला अर्धाच दर मिळतो. अपेक्षित दर मिळत नसल्याने गिलनेटवाले मच्छीमार निराश झाले आहेत. काही दिवसांपूर्वी म्हाकूळ मासा मोठ्या मच्छिमारांच्या जाळ्याला लागत आहे. सध्या त्याचा आकार छोटा असल्यामुळे त्याला दरही योग्य मिळत नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार