शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पालशेत समुद्रात मच्छीमार बोट बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 14:26 IST

boat, khalashi, ratnagiri, jaigad समुद्रातील खराब हवामानामुळे गेली दोन महिने जयगड येथे अडकलेली श्री सोमनाथ नावाची मच्छीमार नौका मुंबईच्या दिशेने जात असताना गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रात बुडाल्याची घटना बुधवारी पहाटे ४.३० वाजता घडली. मात्र, या दुर्घटनेतील सर्व खलाशी सुखरुप आहेत.

ठळक मुद्देपालशेत समुद्रात मच्छीमार बोट बुडाली दुर्घटनेतील सर्व खलाशी सुखरुप

असगोली : समुद्रातील खराब हवामानामुळे गेली दोन महिने जयगड येथे अडकलेली श्री सोमनाथ नावाची मच्छीमार नौका मुंबईच्या दिशेने जात असताना गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रात बुडाल्याची घटना बुधवारी पहाटे ४.३० वाजता घडली. मात्र, या दुर्घटनेतील सर्व खलाशी सुखरुप आहेत.या बोटीवरील ६ खलाशी व १ तांडेल यांनी बोट वाचवण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला. मात्र, नाईलाज झाल्याने समुद्रात उड्या टाकत त्यांनी आपला जीव वाचवला. तब्बल दोन तासांनी ते किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले. समुद्रातील वादळाच्यावेळी मुंबईतील श्री सोमनाथ ही मच्छिमारी नौका जयगड किनाऱ्यावर येऊन पोहोचली होती.

गेले दोन महिने याच परिसरात ही नौका मच्छिमारी करत होती. ही नौका बुधवारी मुंबईच्या दिशेने निघाली होती. पालशेत बंदर परिसरातून ही नौका पुढे जात असताना पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास बोटीत पाणी भरू लागले. संकट ओळखून तांडेलने नौका वेगाने किनाऱ्याच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी वाढतच गेले.अखेर पालशेत बंदरापासून ४ वाव खोल समुद्रात बोट बुडाली. बोट आता बोट वाचणार नाही हे लक्षात येताच ६ खलाशांसह तांडेलांनी समुद्रात उडी घेतली. सकाळी ६.३० पोहोचले. पोलिसांना याबाबतचे वृत्त मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बोट बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यात यश आले नाही. दुर्घटनेत बोटोचे पूर्णत: नुकसान झाले आहे.मत्स्य व्यवसाय खात्याचे अधिकारी देसाई याप्रकरणात अधिक तपास करीत आहेत. या बोटीचे मालक नितीन नथुराम मोंडे हे मुंबईतील आहेत. बोटीवर राहूल संतोष दाभोळकर हे तांडेल म्हणून काम करत होते. तर अक्षय संतोष दाभोळकर, समीर संतोष दाभोळकर, सूर्यकांत शंकर भाटकर, जगदीश जगन्नाथ चिवेलकर,भरत लक्ष्मण भोमे, हरेश शंकर पाचकुडे अशी मच्छिमारांची नावे आहेत.

टॅग्स :boat clubबोट क्लबRatnagiriरत्नागिरी