शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एलईडीविरोधात मच्छीमार आक्रमक, दापोलीत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 14:28 IST

पारंपरिक मच्छीमार एलईडी लाईटने होणाऱ्या मासेमारीविरोधात पुन्हा आक्रमक झाले आहेत. यामुळे कोकणात पुन्हा एकदा पारंपरिक विरुद्ध तांत्रिक मच्छीमार असा संघर्ष पेटणार आहे.

ठळक मुद्देएलईडीविरोधात मच्छीमार आक्रमक, दापोलीत बैठकतीनही जिल्ह्यातील समन्वय समितीत चर्चा

दापोली : पारंपरिक मच्छीमार एलईडी लाईटने होणाऱ्या मासेमारीविरोधात पुन्हा आक्रमक झाले आहेत. यामुळे कोकणात पुन्हा एकदा पारंपरिक विरुद्ध तांत्रिक मच्छीमार असा संघर्ष पेटणार आहे.कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीनही जिल्ह्यातील समन्वय समितीची बैठक दापोलीतील जालगाव खारवी भवन येथे पार पडली. या बैठकीत शासनाविरोधात आक्रमक होऊन २६ जानेवारी रोजी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तांत्रिक मासेमारीने कोकणातील पारंपरिक मच्छीमार चांगलेच बेजार झाले आहेत. एलईडीद्वारे होणाऱ्या मासेमारीने पारंपरिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तांत्रिक मासेमारीला बंदी असूनही मासेमारी होत असल्याने पारंपरिक मच्छीमार आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.दाभोळ खाडी मच्छीमार संघटना व हर्णै बंदर कमिटी यांच्यातर्फे एलईडी लाईटने होणाऱ्या अनधिकृत मासेमारीबाबत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीनही जिल्ह्यातील प्रमुख मच्छीमार प्रतिनिधींची संयुक्त बैठक जालगाव येथील खारवी भवन येथे आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत एलईडी लाईटने होणाऱ्या मासेमारीविरोधात उपस्थितांनी आपल्या भावना आक्रमकपणे मांडल्या. गेली दोन-तीन वर्ष समुद्रात राजरोसपणे एलईडी लाईटद्वारे अनधिकृत पर्सनेट मासेमारी सुरु असल्याने मत्स्यसंपत्ती संपुष्टात आली आहे. त्या

मुळे पारंपरिक मच्छिमारांना मासे मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे देशाला परकीय चलन मिळवून देणारा मासेमारी व्यवसाय चांगलाच संकटात सापडला आहे.पारंपरिक मच्छिमारांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. याचवेळी एलईडी लाईटद्वारे बेकायदेशीर मासेमारी करून समुद्रातील साठे संपुष्टात आणले जात आहेत. या बेकायदेशीर मासेमारीला काही अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे.

त्यांच्याच आशीर्वादाने राजरोसपणे एलईडीद्वारे मासेमारी सुरू असल्याचे मच्छिमारांमधून सांगितले जात आहे. शासनाच्या १९८१च्या मासेमारी कायद्यानुसार मासेमारीच्या हद्दी ठरवून दिल्या आहेत. मात्र, असे असतानाही समुद्रात सरसकट मासेमारी केली जात आहे. 

टॅग्स :Dapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायतRatnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार