शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर परवानगी, या वर्षापासून १०० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

By शोभना कांबळे | Updated: April 27, 2023 19:00 IST

'आपण ते मेडिकल काॅलेजचे स्वप्न बघितले ते आता साकार रूप घेतय'

रत्नागिरी : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत रत्नागिरीत शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय उभारण्यासाठी नॅशनल मेडिकल कमिशन मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्ड (MARB) ची मान्यता मिळाली आहे. मान्यतेसंबंधीचे पत्र २६ एप्रिल रोजी  वैद्यकीयमहाविद्यालयाचे डीन यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरीत यावर्षापासून १०० विद्यार्थ्यांचे वैद्यकीय (एमबीबीएस) महाविद्यालय होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यासाठी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे.रत्नागिरीत १०० विद्यार्थ्यांचे वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी मंत्री सामंत यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता  २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, रत्नागिरी यांच्यामार्फत १०० एमबीबीएस जागांसह नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची विनंती नॅशनल मेडिकल कमिशनकडे (एनएमसी) करण्यात आली होती. वैद्यकीय मूल्यमापन आणि रेटिंग मंडळाने (MARB) १० जानेवारी २०२३ रोजी अहवालाचे परीक्षण केले. महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांची उपलब्धता, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वसतिगृहे, रुग्णालय आणि प्राध्यापकांची उपलब्धता या निकषानुसार एनएमसीने २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षासाठी एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता जाहीर केली आहे.या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या जागेची पाहाणी मंत्री सामंत यांनी काही दिवसांपुर्वीच केली आहे. त्यामुळे आता या महाविद्यालयाला नॅशनल मेडिकल कमिशनची मंजुरी मिळाल्याने या वर्षापासून रत्नागिरीत १०० विद्यार्थ्यांचे वैद्यकीय (एमबीबीएस) महाविद्यालय होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची पुर्तता होण्याच्या दृष्टीने वेगाने कार्यवाही होणार आहे.

आपण ते मेडिकल काॅलेजचे स्वप्न बघितले ते आता साकार रूप घेतय. या मेडिकल काॅलेजला १०० विद्यार्थ्ंसाठी परवानगी मिळाली आहे. याचा अर्थ या वर्षापासून हे मेडिकल काॅलेज सुरू होत आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारचे आरोग्य मंत्री यांचे मी आभार मानतो. - उदय सामंत, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयUday Samantउदय सामंत