शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: समुद्रात बारा तास मृत्यूशी झुंज, पाच खलाशी बचावले; जयगड-हर्णैमध्ये मासेमारी नौका उलटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 19:15 IST

आलो तर तुमचा, नाहीतर देवाचा

दापोली : तब्बल बारा तास खोल समुद्रात पाण्याशी झुंज देत पाच खलाशांनी आपले जीव वाचविले आहेत. ही घटना जयगड ते हर्णै दरम्यानच्या समुद्रात घडली. त्यातही त्यांच्यातीलच एक खलाशी नरेंद्र चौगुले यांनी तब्बल पावणेसात तास पोहून एक मासेमारी नौका गाठली आणि मदत मिळवून सर्व खलाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणले.दि. २४ डिसेंबरला घडलेली ही घटना आता पुढे आली आहे. हर्णै बंदरातील बोट २४ डिसेंबरला खोल समुद्रात मासेमारी करीत होती. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक मालवाहू पॅसेंजर बोट त्यांच्यासमोरून गेली आणि त्यामुळे अचानक जोराच्या लाटा उसळल्या. या लाटांमुळे मासेमारी करणारी नौका उलटली. इंजिनमध्ये पाणी गेले आणि त्या नौकेत बिघाड झाला. नौकेतील खलाशांसमोर मोठे संकट उभे राहिले. या नौकेवर नरेश रामचंद्र चौगुले, त्यांचा मुलगा पराग चौगुले, दीपक महसला (वाशी रायगड), वैभव गजानन चौगुले आणि दिलीप (वाशी रायगड) असे पाचजण होते.चौगुले यांनी सर्वांना दिलासा देत जी गोष्ट हातात लागेल त्याला धरून तरंगत राहण्याची सूचना केली. सहा वाजता नरेश चौगुले यांनी बाकी सर्वांना तेथेच थांबविले आणि स्वत: पोहत मदतीसाठी निघाले. ते दुपारी पाऊण वाजण्याच्या दरम्यान त्यांना गोव्याच्या सीमेवरील एक नौका त्यांना लांबवर दिसली. त्या नौकेपर्यंत जाऊन त्यांना ही घटना सांगितली. इतर खलाशी होते, तेथे ही नौका आणून त्यांनी सर्वांना नौकेवर घेतले.नरेश चौगुले यांनी आपल्या भावांना पाजपंढरी गावात फोन केला. तेथून हर्णै बंदरात फोन गेला व हर्णै बंदरातून दोन फायबर या खलाशांना परत आणण्यासाठी गेल्या. परतल्यानंतर सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. नरेश चौगुले यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

आलो तर तुमचा, नाहीतर देवाचापहाटे सहा वाजता जेव्हा नरेश चौगुले मदत आणण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की, मी जाऊन मदत घेऊन येतो. जर आलाे तर तुमचा नाही तर देवाचा. त्यांचे हे शब्द इतरांना दिलासा देण्याबरोबरच काळजाला हात घालणारेही ठरले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग