२. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये विविध शासकीय कार्यालयांतून प्रथमदर्शनी सॅनिटायझर मशीन बसविण्यात आल्या आहेत. जेणेकरुन येणाऱ्या व्यक्तीने कार्यालयात प्रवेश करताना सॅनिटायझर लावून प्रवेश करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक कार्यालयांमधून हजारो रुपयांची बसवलेली ही मशीन सॅनिटायझर नसल्यामुळे रिकामीच असते. त्यामुळे कोरोना महामारीबाबत लावण्यात आलेल्या नियमावलीचे पालन केवळ लोकांनीच करावे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
३. खेड तालुक्यातील कोरेगाव खाडीपट्ट्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेले कोरोना सेंटर बंद झाले आहे. योग्य त्या उपाययोजना न करता तयार केलेले हे सेंटर केवळ निवडणुका येत असल्याने तयार केले होते का? असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य नफिसा परकार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. सुमारे २० दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेले हे कोरोना सेंटर बंद झाले आहे.