शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना दिनी आगळावेगळा उत्सव; उदय सामंत यांनी सांगितले जिल्ह्यातील नियोजन

By मनोज मुळ्ये | Updated: January 14, 2024 17:47 IST

हा आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक सोहळा असल्याने सर्व लोकांनीही आपल्या घरासमोर गुढी उभारावी, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.

रत्नागिरी : अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होत असताना जिल्ह्यातही हा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यात १९६ राम मंदिरे असून, तेथे विद्युत रोषणाईसह गुढी उभारली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी स्थानिक कलावंतांचा गीतरामायण कार्यक्रम केला जाणार आहे आणि जिल्ह्यात सर्वत्र सायंकाळी ४ वाजता भव्य मिरवणूकही काढली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महायुतीतर्फे पालकमंत्री सामंत, आमदार योगेश कदम, किरण तथा भैय्या सामंत, भाजपचे प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील राम मंदिरांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत मंत्री सामंत यांनी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी २२ रोजीच्या नियोजनाची माहिती दिली. जिल्ह्यात १९६ राम मंदिरे आहेत. दि. २२ रोजी या सर्व मंदिरांमध्ये प्रतिष्ठापना सोहळा साजरा केला जाणार आहे. २१ पासूनच सर्वत्र रोषणाई केली जाईल. रत्नागिरीतील प्रमुख राम मंदिरामध्ये पहाटेपासूनच विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. २२ रोजी अयोध्येत होणारा सोहळा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या पडद्यावर दाखवण्याची व्यवस्थाही केली जाणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

जिल्ह्यान ४६६३ ग्रामदेवतांची मंदिरे आहेत. त्यावरही यानिमित्त रोषणाई केली जाणार आहे. प्रत्येक राम मंदिराबाहेर गुढी उभारली जाणार आहे. हा आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक सोहळा असल्याने सर्व लोकांनीही आपल्या घरासमोर गुढी उभारावी, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.२२ रोजी जिल्ह्यात सर्व ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्ह्याचा प्रमुख कार्यक्रम म्हणून रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे गीत रामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री ९ वाजता तेथे फटाक्यांची आतषबाजीही केली जाणार आहे. अनेक राम मंदिरांमध्ये आधीपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्वच कार्यक्रमांसाठी स्वतंत्र समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यात असतील, असेही ते म्हणाले.

१९६ मंदिरांमध्ये गीतरामायणस्थानिक कलाकारांना सोबत घेत जिल्ह्यातील सर्व राम मंदिरांमध्ये गीत रामायण कार्यक्रम करण्याची सूचना प्रमोद जठार यांनी बैठकीत मांडली. त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी हा कार्यक्रम होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. प्रतिष्ठापना होताना जिल्ह्यात घंटानाद होणारदुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे. १ मिनीट २३ संकेद हा मुहुर्त असून, त्यावेळी जिल्ह्यात सर्वत्र घंटानाद केला जाणार आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंत