सुपीकता फलकाचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:28 AM2021-04-12T04:28:26+5:302021-04-12T04:28:26+5:30

साखरपा : कनकाडी ग्रामपंचायतीत गावाच्या जमीन सुपीकता फलकाचे अनावरण करण्यात आले. कृषी सहाय्यिका निशिगंधा डांगे यांनी हा फलक तयार ...

Fertility panel unveiled | सुपीकता फलकाचे अनावरण

सुपीकता फलकाचे अनावरण

Next

साखरपा : कनकाडी ग्रामपंचायतीत गावाच्या जमीन सुपीकता फलकाचे अनावरण करण्यात आले. कृषी सहाय्यिका निशिगंधा डांगे यांनी हा फलक तयार केला. त्यांच्यात हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्यपत्रिका कार्यक्रमाचा द्वितीय स्तर पूर्ण झाला आहे.

पाणीपुरवठा बंद

मंडणगड : पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवल्याने वलाैते -बाैद्धवाडीतील ग्रामस्थांनी मंडणगड तहसील कार्यालयात तक्रारवजा निवेदन दिले आहे. वलाैते ग्रामपंचायतीद्वारे बाैद्धवाडीला नळपाणी योजनेच्या माध्यामातून पिण्याचे पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती निवेदनातून दिली आहे.

मुद्रांक तुटवडा नाही

रत्नागिरी : मुद्रांकांचा कोणताही तुटवडा नाही. लागोपाठच्या सुट्यांमुळे मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने नूतनीकरण थांबल्यामुळे मुद्रांकांचा तुटवडा असल्याचे समाज माध्यामावर सांगितले जात आहे. मात्र, मुद्रांकांचा कोणताही तुटवडा नाही. केवळ मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने नूतनीकरण सुट्यांमुळे रखडल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

नववर्ष स्वागत यात्रा रद्द

रत्नागिरी : यंदा शहरामधील नववर्ष स्वागत यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्ना सुवेर यांनी दिली आहे. दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त शहरामध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेमध्ये पारंपरिक विविध वेषभूषेसह विविध आकर्षक पाैराणिक चित्ररथ सहभागी होतात.

धरणे आंदोलन

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी सिंचनाखालील शेतजमीन मिळालेली नाही. याबद्दल धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व शेतकरी-कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली. दि. १९ रोजी सकाळी ११ ते ५ यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे.

वासरावर हल्ला

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये गवळीवाडीत बिबट्याने गोठ्यातील वासरावर हल्ला करून त्याला ठार मारले. घराशेजारील जागेत पाच गुरे बांधण्यात आली होती. वासरावर हल्ला करून फडशा पाडला आहे. वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली असून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मार्लेश्वर देवस्थान बंद

देवरूख : कोरोनाच्या नव्या नियमावलीनुसार धार्मिकस्थळे बंद ठेवण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. त्यानुसार शासनाच्या आदेशाचे पालन करून मार्लेश्वर देवस्थान कमिटीने भाविकांसाठी प्रवेश बंद करून मंदिरच बंद केले आहे. केवळ पुजारी नियमित पूजा मात्र करीत आहेत.

शिंपणे रद्द

देवरूख : संगमेश्वर येथील शिंपणे उत्सव कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. रविवार दि. ११ एप्रिल रोजी शिंपणे उत्सव होणार होता. कोरोनामुळे श्री निनावी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिंपणे उत्सव रद्द करण्यात आला आहे.

कंटेन्मेंट झोन कार्यान्वित

खेड : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या एक हजार ८२३ वर पोहोचली असून ३५ ठिकाणी कंटेन्मेंट झोन कार्यान्वित करण्यात आले आहेत. गेल्या चार दिवसात ही संख्या वाढली असल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तालुक्यात आतापर्यत ८३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

बसफेरीला उत्तम प्रतिसाद

खेड : खेड-तुळशी-विरार-अर्नाळा बसफेरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या बसफेरीला दि.१५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ही बसफेरी कायम करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दोन दिवस लाॅकडाऊन असल्यामुळे बसफेरीवर परिणाम झाला असला तरी अन्य दिवसात चांगले भारमान लाभत आहे.

Web Title: Fertility panel unveiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.