शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाऊनमुळे फळपिक विमा योजनेपासून शेतकरी वंचित, रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा संख्या घटली

By मेहरून नाकाडे | Updated: December 1, 2023 17:38 IST

३० नोव्हेंबर पर्यंत फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख देण्यात आली होती

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे आंबा, काजू पिकाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत मिळावी या उद्देश्याने जिल्ह्यात फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी दि.३० नोव्हेंबर अंतिम तारीख होती. शेवटच्या तारखेला सर्व्हर डाऊन असल्याने फळपिक विमा योजनेतील सहभागापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातून एकूण ३० हजार २५१ शेतकरी फळपिक विमा योजनेत सहभागी झाले असून गतवर्षीपेक्षा दोन हजारने संख्या घटली आहे. त्यामुळे फळपिक विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत आहे.बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा, काजू पिकावर होत आहे. पिकासाठी केलेला खर्चही निघत नाही. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आंबा काजू पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एेश्चिक आहे. दि.३० नोव्हेंबर पर्यंत फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख देण्यात आली होती.मात्र गेल्या आठवड्यात सर्व्हरची समस्या असल्याने विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अडसर येत होता. शेवटच्या दिवशी तर सर्व्हरने चांगलाच दगा दिला. त्यामुळे गतवर्षीच्या संख्येइतकीही संख्या होऊ शकली नाही. गतवर्षी ३२ हजार शेतकरी फळपिक विमा योजनेत सहभागी झाले होते. यावर्षी मात्र ३० हजार २५१ शेतकऱ्यांचा सहभाग राहिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी