शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूरबाबत भूमिका स्पष्ट करावी

By admin | Updated: July 27, 2014 00:49 IST

नीलेश राणे यांचा इशारा : शिवसेनेकडून नागरिकांची फसवणूक

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि इकोसेन्सिटिव्ह झोन या प्रमुख मुद्द्यांबाबत लोकांना भूलथापा देऊन शिवसेनेने मते मिळविली; पण आता या दोन्ही मुद्द्यांबाबत आपली नेमकी भूमिका काय आहे, हे दहा दिवसांच्या आत शिवसेनेने स्पष्ट करावे, अन्यथा यावर मला उत्तर द्यावे लागेल, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.शहरातील त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझील येथे गेले असता त्यांनी तिथेही जैतापूर प्रकल्प होणार, असा शब्द दिला. परत मुंबई आल्यावरही त्यांनी भाभा संशोधन केंद्रालाही असाच शब्द दिला. म्हणजे कोकणात शिवसेनेने ज्या मुद्द्यावर लोकांची मते मिळविली, त्याबाबत आता पक्षाची आणि त्यांच्या खासदारांचीच नेमकी भूमिका काय, हे येत्या दहा दिवसांत स्पष्ट करावे. केवळ शाब्दिक विरोध दाखवून उपयोग नाही. आता लोकांपुढे जाऊन त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल, असे ते म्हणाले.इकोसेन्सिटिव्ह झोनबाबत ते म्हणाले की, अंदाजपत्रक जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच सभागृहात ‘इन्व्हायरल फॉरेस्ट’वर चर्चा झाली. यावेळी केरळमधील खासदारांनी इकोसेन्सिटिव्हला विरोध दर्शविला. मग आपल्या कोकणच्या विद्यमान खासदारांनी विरोध का दर्शविला नाही? या दोन प्रमुख मुद्द्यांबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका आता त्यांनी स्पष्ट करावी, असा पुनरुच्चार त्यांनी केला.खासदार विनायक राऊत यांना कोकण रेल्वे बोर्ड आणि रेल्वे बोर्ड यांच्यातील फरकच कळलेला नाही. याच चर्चेवेळी या विद्यमान खासदारांनी हे दोन्ही बोर्ड एकत्र यावेत, असा मुद्दा मांडला. हे दोन बोर्ड एकत्र केले तर कोकणला काय मिळेल, हे सांगायलाच नको, अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली.केवळ आमच्यावर टीका करण्यापलीकडे राऊत यांना लोकांच्या कामाशी देणेघेणे नाही. म्हणूनच ज्या मुद्द्यावर त्यांना लोकांनी निवडून दिले, त्या मुद्द्यांबाबत त्यांनी आपली भूमिका मांडावी, अन्यथा ते मुद्दे घेऊन आपण येत्या विधानसभा निवडणुकीत लोकांसमोर जाऊ, असा इशारा त्यांनी दिला. असे काही होणार नाही...नारायण राणे यांचे समर्थक सुभाष बने, गणपत कदम शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राजकीय चित्र बदलतंय का? या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी ‘असे काही होईल, असे वाटत नाही,’ असे मत व्यक्त केले. तसेच नारायण राणे यांना केसरकर आणि उपरकर हे प्रतिस्पर्धी निर्माण झाले आहेत का, या प्रश्नावर ते म्हणाले की, त्यांना मीडियानेच मोठे केले आहे. त्यांच्यात काही ताकद आहे, असे वाटत नाही. (प्रतिनिधी)