शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

बारसूतील खोदकाम संपले, विरोधकांचे मनाई आदेश उठले

By मनोज मुळ्ये | Updated: May 15, 2023 18:16 IST

रत्नागिरी / राजापूर : तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीचे माती परीक्षणाचे काम रविवारी संपले. एकूण ६६ बोअरवेल ...

रत्नागिरी / राजापूर : तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीचे माती परीक्षणाचे काम रविवारी संपले. एकूण ६६ बोअरवेल खोदल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दोन महिन्यात या माती परीक्षणाचा अहवाल येणार असून, त्यानंतरच बारसूमध्ये प्रकल्प होणार नाही हे निश्चित होणार आहे. दरम्यान हे काम आटोक्यात आल्याने रिफायनरी विरोधकांना लागू करण्यात आलेले मनाई आदेश रद्द करण्यात आले आहेत.

एप्रिल महिन्यापासून बारसू, सोलगाव परिसरातील सड्यावर रिफायनरी प्रकल्पासाठीचे माती परीक्षणाचे काम सुरु होते. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. स्थानिकांनी या कामाला जोरदार विरोध करत ते काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही बारसूचा दौरा केला. कामात अडथळा येऊ नये म्हणून या परिसरात सुमारे २००० पोलिस तैनात ठेवण्यात आले होते.रविवारी माती परीक्षणाचे काम संपले असून, हे काम करणाऱ्या इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड या कंपनीने मातीचे नमुने हैद्राबादच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल दोन महिन्यात येण्याची शक्यता आहे.

माती परीक्षणाचे काम आटोक्यात येत असतानाच गुरुवारी (११ मे) प्रकल्प विरोधी नेत्यांना बजावण्यात आलेले मनाई आदेश माग घेण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मनाई आदेशान्वये रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश व संचार करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला होता. हे आदेश पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या दि. ११ मे २०२३ च्या पत्राच्या अनुषंगाने मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. संबंधित रद्द आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.

यांच्याविरुद्ध होते आदेशदेवाप्पा अण्णा शेट्टी उर्फ राजू शेट्टी (रा. अर्जुनवाड रोड, ता. शिरोळ जि. कोल्हापूर, खासदार व अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनार्दन गुंडू पाटील, (रा. परीते, ता. करवीर, जि. कोल्हापूर, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी संघटना, कोल्हापूर), अशोक केशव वालम (रा. नाणार, ता. राजापूर), जालिंदर गणपती पाटील, (रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), स्वप्निल सीताराम सोगम (रा. पन्हळे तर्फे राजापूर, ता. राजापूर), सत्यजित विश्वनाथ चव्हाण, (रा. राम आनंदनगर हाऊसिंग सोसायटी, दहिसर पूर्व, मुंबई) यांच्याविरुद्ध हे आदेश बजावण्यात आले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी