शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पर्ससीन बंदीचा सर्वांनाच फटका

By admin | Updated: March 17, 2016 23:34 IST

मालवाहकांची गर्दी ओसरली : आर्थिक उलाढालही ठप्प

रत्नागिरी : पर्ससीन नेटधारक मच्छीमारांना १ जानेवारी ते १५ मेपर्यंत मच्छीमारीस बंदी घातल्याने येथील मिरकरवाडासह अनेक मच्छीमारी बंदरातील मोठे आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. या बंदरांवर असलेली मच्छीमार, मालवाहकांची गर्दीही ओसरली आहे. आर्थिक उलाढाल ठप्प होण्याबरोबरच मच्छीमारीवर अवलंबून असलेल्या अनेक जोडधंद्यांना याचा जबर आर्थिक फटका बसला आहे. त्यातच पर्ससीन नेटधारक मच्छीमारांनी पारंपरिक पध्दतीच्या जाळ्यांनी मच्छीमारी न करता किनाऱ्यावरच राहणे पसंत केल्याने खलाशीही बेरोजगार झाले आहेत. जिल्ह्यातील मिरकरवाडा, हर्णै, जयगड, साखरीनाटे, राजिवडा, पूर्णगड, वरवडे, दाभोळ यासारख्या अनेक मच्छीमारी बंदरांमधील गजबज कमी झाली आहे. येथील मच्छीची वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळही आता एकदम कमी झाली आहे. मच्छीच्या वाहतुकीतून हजारो वाहने, छोटे टेम्पो यांना आर्थिक बळ मिळाले होते. मात्र, पर्ससीन नेटवर बंदी घातल्यानंतर या वाहनांना कामच उरलेले नाही. मच्छी वाहतुकीसाठी कर्जावर वाहने घेतलेल्यांना आता कर्जाचे हप्ते कसे भरावेत, असा प्रश्न पडला आहे. मच्छी परराज्यात नेणाऱ्या ट्रकमालकांनाही याचा आर्थिक फटका बसला आहे. मच्छीमारीमुळे बंदरात ये-जा करणाऱ्या मच्छीमारी नौकांसाठी लागणारे पाणी टॅँकरद्वारे पुरवठा करणाऱ्यांनाही पर्ससीन मच्छीमारी बंदीची झळ बसली आहे.त्याचबरोबर प्रत्येक बंदराच्या ठिकाणी असलेले वडापाव विक्रेते, अन्य खाद्य व्यावसायिक यांच्या व्यवसायावरही गंभीर परिणाम झाला आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यातील विविध बाजारपेठाही मच्छीमारी हंगामावरच बहुतांशी अवलंबून आहेत. मच्छीमारी व्यवसाय चांगला चालला की या बाजारपेठांमध्येही तेजी असते. मात्र, आता बाजारपेठांमध्येही त्याचा दुष्परिणाम दिसू लागल्याने व्यापारीवर्गही हवालदिल झाला आहे. मच्छीमारी व्यवसायासाठी लागणारे विविध साहित्य विक्री करणारे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. रत्नागिरीतील मिरजोळे औद्योगिक वसाहतीतील फीशमील्सनाही प्रक्रियेसाठी मच्छी मिळेनाशी झाली असून, त्यांचे कामही कमी झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नेपाळी लोक आंबा बागायतींमध्ये रखवालदार म्हणून काम करतात तसेच ते मच्छीमारी नौकांवरही खलाशी म्हणून काम करतात. स्थानिकांबरोबरच कर्नाटक, केरळ येथील खलाशीही जिल्ह्यातील मच्छीमारी नौकांवर खलाशी म्हणून काम करीत आहेत. पर्ससीन नेटच्या एका नौकेवर किमान २५ ते कमाल ३० खलाशी कार्यरत असतात. गेल्या १ जानेवारीपासून पर्ससीन नौका किनाऱ्यावरच असल्याने दर दिवसाचा खलाशांवरील २० हजार खर्च हा नौका मालकांना करावाच लागत आहे. त्यामुळे बंदरातून पर्ससीन नौका सुरक्षित स्थळी नेण्याची परवानगीही मालकांनी मत्स्य आयुक्तांकडे मागितली आहे. (प्रतिनिधी)तीव्र प्रतिक्रिया : पारंपरिक मच्छीमार ठामपर्सनेटला घातलेली बंदी उठवू नये या भूमिकेवर पारंपरिक मच्छीमार ठाम आहेत. कोणत्याही स्थितीत पर्ससीनवरील बंदी उठवू नये, यासाठी त्यांचा लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक मच्छीमारांनी अत्याधुनिक मच्छीमारांच्या अतिक्रमणाखाली हलाखीचे दिवस काढल्याच्या तीव्र प्रतिक्रीयाही व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर पारंपरिक मच्छीमार आक्रमक का झाले याचा विचार पर्सनेट मच्छीमारांनी करण्याची आवश्यकता आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या सागरी क्षेत्रातील हद्दीत पर्सनेट नौकांनी मच्छीमारी केल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे.गोवा, मुंबईचे मासे रत्नागिरीतपर्सनेट मच्छीमारीवर राज्यात जरी बंदी असली, तरी अन्य राज्यात अशी बंदी नाही. त्यामुळे तेथील सुरमई, पापलेट व अन्य प्रकारचे मासे रत्नागिरीसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही विक्रीसाठी आणले जात आहेत. हर्णै येथील मासेही मोठ्या प्रमाणात रत्नागिरी बंदरात विक्रीसाठी येत आहेत. तरीही मच्छीची कमतरता भासत असून, मच्छीमारांच्या या भांडणात मच्छी खवय्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. एकिकडे गोव्याची मच्छी रत्नागिरीत येत असताना अन्य राज्यांतील पर्सनेट मच्छीमारी नौकांची कोकण किनाऱ्यावर घुसखोरी होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.