शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रिफायनरीचे घोडे बारसूच्या गंगेत न्हाणार, पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 08:09 IST

जागा उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी लिहिले पंतप्रधानांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : तब्बल चार लाख कोटींची  गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प नाणारला होणार की बाहेर जाणार, याबाबत चार वर्षे सुरू असलेला गोंधळ मिटण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र व पर्यावरण आदित्य ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात केलेली विधाने पाहता प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन कंपन्यांनी एकत्र येऊन रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल्स कंपनी लि. ची स्थापना केली. या प्रकल्पासाठी कंपनीने सर्वाधिक पसंती नाणार व परिसरातील १४ गावांना दिली. मात्र तेथील विरोधामुळे आम्हीही लोकांच्या बाजूने असे म्हणत विरोध वाढत गेला. शिवसेनेकडून मतांची अपेक्षा असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २०१९ मध्ये यासाठीची नाणारमधील अधिसूचना रद्द केल्याने प्रकल्प होणार की नाही, हे स्पष्ट होत नव्हते. शिवसेनेने सकारात्मक भूमिका घेतल्याने प्रकल्प बारसूमध्ये होणार हे स्पष्ट झाले आहे.

आदित्य ठाकरे सकारात्मकशिवसेनेतील एकमेव आदित्य ठाकरे यांनी मंत्री होण्याआधी ही रिफायनरी बाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. आता कोकण दौऱ्यावर त्यांनी हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातच लोकांना हवा तेथे करु, असे सकारात्मक संकेतही दिले.

१३ हजार एकर जागा देणारमुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकल्पासाठी बारसू येथे १३ हजार एकर जागा उपलब्ध करुन देण्याचे पत्र पंतप्रधानांना पाठवले. आतापर्यंत ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली प्रकल्पाला विरोध केला जात होता. मात्र आता त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विरोधात मोर्चाn तथाकथित सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली राजापुरात बुधवारी बारसूमध्ये होऊ शकणाऱ्या प्रकल्पाला विरोध करणारा मोर्चा काढण्यात आला. n मात्र, यावेळी शिवसेना त्यात नसल्याने विरोधाचा जोर किती टिकणार, हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAditya Thackreyआदित्य ठाकरे