शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात वाहतूक कोेंडीमुळे अनेक भक्तगण उशिरापर्यंत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 14:31 IST

वाहतूक कोेंडीमुळे अनेक भक्तगण सायंकाळी उशिरापर्यंत दाखल होत होते. ढोल - ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३५७ घरगुती, तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. रत्नागिरीत पुढील १२ दिवस आता गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येणार आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणपतीची विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह, भक्तगण दाखलभक्त भक्तीरसात न्हाले : १ लाख ६५ हजार मूर्तींची प्रतिष्ठापना

रत्नागिरी : ढोल - ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३५७ घरगुती, तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. रत्नागिरीत पुढील १२ दिवस आता गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येणार आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणपतीची विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी अवघा भक्तगण उत्साही झाला होता. गेल्या दोन दिवसात मुंबईकरांचेही मोठ्या संख्येने आगमन झाले असून, गेले चार दिवस एस. टी., रेल्वे, खासगी गाड्यातील गर्दी ओसंडून वाहत आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे. चारचाकी खासगी वाहनांनी तसेच दुचाकीनेदेखील मुंबईकर गावी आले आहेत.गुरुवारी सकाळपासूनच अनेक ठिकाणी मिरवणुकीने गणेशमूर्ती घरोघरी नेण्यात आल्या. लांबच्या ठिकाणी असलेल्या अनेकांनी गणेशमूर्ती आदल्या दिवशीच मिरवणुकीने घरी नेल्या होत्या. मात्र तरीही दुपारपर्यंत गणेशमूर्ती मिरवणुका सुरू होत्या.गणेश चतुर्थीनिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालयांना एक दिवस सुट्टी असून, खासगी कार्यालयेही सणानिमित्त बंद होती. त्यामुळे सकाळपासून बाजारात शुकशुकाट होता. सायंकाळी बाजारात चिबूड, काकडी, फळे, भाज्या विक्रेत्यांनी गर्दी केली होती.

ऋषी पंचमीचे व्रत अनेक भाविक करीत असतात. यादिवशी केवळ मानवी श्रमाने पिकविलेले धान्य, भाज्यांचा आस्वाद घेतला जातो. त्यामुळे खास ऋषी पंचमीसाठी लागणारे तांदूळ, भाज्या विके्रत्यांनी गर्दी केल्याने बाजारात ग्राहकवर्गाचीही बऱ्यापैकी गर्दी झाली होती.भक्तगण उशिरापर्यंत प्रवासातमुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यात आले असले तरीही काही ठिकाणी महामार्गाची स्थिती नाजूकच आहे. तसेच वाहतूक कोेंडीमुळे अनेक भक्तगण सायंकाळी उशिरापर्यंत दाखल होत होते. त्यामुळे आज गणेश चतुर्थी असतानाही ग्रामीण भागाकडे जाणाºया बसेस मुंबईकरांच्या गर्दीने फुल्ल झाल्या होत्या.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ratnagiriरत्नागिरी