शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

अभियंते, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे

By admin | Updated: March 30, 2015 00:14 IST

ओमप्रकाश गुप्ता : मुख्यामंत्र्यांच्या सुचनेनुसार अपेक्षित बदल घडवणार

रत्नागिरी : शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात समाधानकारक सेवा देण्यासाठी महावितरणने चंग बांधला असून, त्याप्रमाणे काम करण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश गुप्ता यांनी केले आहे. त्याचबरोबर महावितरण कंपनीचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच राहावे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. ते रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते.ग्रामीण भागात आजही तासन्तास वीज खंडित होण्याच्या घटना घडतात. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने तातडीने दखल घेतली जात नाही. कामाच्या ठिकाणी अभियंता किंवा लाईनमन उपलब्ध नसतात. ही स्थिती केवळ अतिहानीमुळे भारनियमन सुरू असलेल्या भागाचीच नाही, तर भारनियमन नसलेल्या ग्रामीण भागात असल्याच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला कार्यपध्दतीत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अमूलाग्र बदल करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. याबाबत गुप्ता यांनी महावितरणतर्फे प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही चांगली सेवा देण्यासाठी महावितरणला लोकसहभाग वाढवण्याची आवश्यकता आहे. अभियंते व कर्मचारी मुख्यालयी राहण्यासाठी गुप्ता यांनी स्पष्ट सूचना केल्या आहेत. ग्रामीण भागात खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत वस्तुस्थितीची माहिती व्हावी, यासाठी यापुढे एक रजिस्टर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ठेवण्याची सूचना केली आहे. त्यात खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा संपूर्ण तपशील ग्रामपंचायतीतर्फे नोंदविला जाणार आहे. शिवाय ग्राहकांना या रजिस्टरमध्ये वीजविषयक तक्रारीही नोंदविता येणार आहेत, असे गुप्ता यांनी यावेळी स्पष्ट केले.नवीन जोडण्या देताना कोणताही गैरप्रकार होऊ नये किंवा किमान वेळेत जोडण्या मिळाव्यासाठी आॅनलाईन यंत्रणा उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु अद्याप या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर होताना दिसत नाही. शिवाय जोडण्यांमध्ये विलंब होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना जोडण्या देण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.‘ग्राहक आहेत म्हणून आपण आहोत’ याचे भान महावितरणच्या प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांने ठेवून ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे गुप्ता यांनी सांगितले. विद्युत अधिनियम २००३ मधील सुधारणा लवकरच कायद्याचे रूप घेणार आहे. परंतु महावितरणच्या कार्यपध्दतीतील बदल कायद्यातील बदनापेक्षा केला तर जनमानसातील महावितरणची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल. शिवाय मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेली यंत्रणा देता येईल, असे गुप्ता यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)