शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा विकास कार्यक्रम- सौर ऊर्जेमुळे होणार १५ लाखांची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:17 IST

Zp Ratnagiri- रत्नागिरी जिल्हा परिषद भवनात अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यातून १३० कि.वॅ. ऊर्जेची निर्मिती होणार असून संपूर्ण परिषद भवनाला या ऊर्जेचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे वर्षाला सुमारे १५ लाख रुपये वीजबिलापोटी वाचणार आहेत.

ठळक मुद्देयंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात अविरत वीज मिळण्यास मोलाची मदत

रत्नागिरी : रत्नागिरीजिल्हा परिषद भवनात अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यातून १३० कि.वॅ. ऊर्जेची निर्मिती होणार असून संपूर्ण परिषद भवनाला या ऊर्जेचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे वर्षाला सुमारे १५ लाख रुपये वीजबिलापोटी वाचणार आहेत.जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ऊर्जा विकास कार्यक्रमातून ही वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी ८७ लाख ६९ हजार ८५२ रुपये निधी मंजूर झाला आहे. या कार्यालयातील खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने सौरऊर्जा निर्मितीला प्राधान्य दिले आहे.

जिल्हा परिषद इमारतीला वर्षाला सुमारे २ लाख १९ हजार ८३२ युनिट विजेची गरज लागते. प्रमुख पदाधिकारी, खातेप्रमुख, पदाधिकारी यांच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा, पंख्यांचा वापर सर्वाधिक होतो. त्यांचे वार्षिक वीजबिल सुमारे १५ लाख रुपये येते. त्यासाठी सौरऊर्जा वीजनिर्मितीला आता प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वीजबिलाच्या सुमारे १५ लाख रुपयांची बचत होणार आहे.या सौरऊर्जेतून परिषद भवनाला अविरत वीज मिळण्यास मोलाची मदत होणार आहे. या प्रकल्पातून परिषद भवनाच्या इमारतीच्या वरच्या छतावर सौर पॅनल लावण्याचे काम सुरू आहे.

प्रकल्प राबवल्यानंतर त्याला अनुदानापोटी मेडाकडून रक्कमही मिळण्यास मदत करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० च्या ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौर उपकरणे बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्या प्रस्तावानुसार एकूण ८७ लाख ६९ हजार ८५२ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या ८ ते १० दिवसांत परिषद भवन सौरऊर्जेवर चालणार आहे.चार पंचायत समितीतहीजिल्हा परिषदेनंतर मंडणगड, गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर या चार पंचायत समिती कार्यालयांच्या इमारतींसाठीही रुफ टॉप नेट मीटरिंग सौर विद्युत संच बसविण्यात येणार आहेत. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी