शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील कांदळवनांच्या हिरव्या पट्ट्यातील अतिक्रमणे रोखणार

By शोभना कांबळे | Updated: April 26, 2024 16:56 IST

सात जिल्ह्यांतील क्षेत्रांचे नव्याने सर्वेक्षण करण्याच्या ‘एमआरएसएसी’ला सूचना

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीलगत असलेल्या कांदळवनांच्या हिरव्या पट्ट्यात होत असलेली अतिक्रमणे रोखण्यासाठी राष्ट्रीय कांदळवन कक्षाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने राष्ट्रीय कांदळवन कक्षाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरला (एमआरएसएसी) कोकणातील सात जिल्ह्यांतील कांदळवन क्षेत्रांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांमधील किनारपट्टीचा अभ्यास करण्यात येणार आहे.कोकणातील कांदळवने पर्यटनाच्या दृष्टीनेही विकसित होत आहेत. अनेक ठिकाणी खारफुटीच्या जंगलात नौकाविहार, पक्षीनिरीक्षण आदी पर्यटन विकसित करणारे घटक आहेत. असंख्य जीवांचा अधिवास आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून या जंगलात स्थानिकांना रोजगार मिळविण्यासाठी अनेक उपजीविकेची साधने निर्माण करण्यात येत आहेत. याबाबत उच्च न्यायालयाने आदेश देऊनही अनेक प्राधिकरणे कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरण करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या जंगलांवर वन विभागाचाही ताबा ४० ते ५० टक्के आहे. काही जिल्ह्यांत सिडकोनेही खारफुटीच्या जंगलावरील ताबा सोडलेला नाही. त्यामुळे आता कांदळवन कक्षाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन केंद्राद्वारे कोकणातील या सात जिल्ह्यांमधील कांदळवन क्षेत्रांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जैवविविधतेने समृद्ध अशा या ‘ग्रीन बेल्ट’चा पर्यटनीय आराखडा तयार करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. तसेच या सर्वेक्षणात कांदळवनाचे क्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीनेही विकसित करण्यासाठी प्रस्तावित करण्याच्या सूचना कांदळवन कक्षाला दिल्या आहेत. खारफुटीमध्ये झाडेझुडपे, ताड जातीची झाडे, औषधी वनस्पती आणि जमिनीलगत वाढणाऱ्या प्रजातींचा समावेश असतो. खारफुटीची मुळे भरतीच्या पाण्याचा वेग रोखतात. खारफुटी ही अनेक जलचरांचे आश्रयस्थान आहे. त्यामुळे आता खारफुटी जंगलाचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रासाठी दहा कोटींचा निधी खारफुटीच्या अनेक जाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यासाठी मुंबई येथील वडाळा येथे कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये, किनारी भागात आणि प्रतिष्ठानच्या कार्यालयात कांदळवनांचे संरक्षण, त्याचे महत्त्व समजावून सांगून कांदळवन संवर्धनात विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक यांचा सहभाग मिळविण्याचे कामही सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी