शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत अतिक्रमणे हटवली, नगर परिषदेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 11:44 IST

रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने वाहतुकीला अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तामध्ये हटवली. अतिक्रमणविरोधी पथकाने दिलेल्या सुचनांनुसार व्यावसायिकांनीही या मोहिमेला सहकार्य करीत आपले बस्तान हलवून रस्ते मोकळे केले.

ठळक मुद्देरत्नागिरीत अतिक्रमणे हटवली, नगर परिषदेची कारवाई मारुती मंदिर येथील भाजी विक्रेत्यांचे सहकार्य

रत्नागिरी : शहरातील मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने वाहतुकीला अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तामध्ये हटवली. अतिक्रमणविरोधी पथकाने दिलेल्या सुचनांनुसार व्यावसायिकांनीही या मोहिमेला सहकार्य करीत आपले बस्तान हलवून रस्ते मोकळे केले.मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या पुढील बाजूस बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना हटविण्याच्या विषयावरून गुरुवारी सायंकाळी शिवसेना व स्वाभिमान पक्ष असा संघर्ष झाला होता. भाजी विक्रेत्यांच्या मागणीनुसार संपूर्ण शहरात शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार असल्याची घोषणा प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी केली होती.शुक्रवारी सकाळपासून रत्नागिरी मुख्य एस. टी. बस स्थानकासमोरील रस्त्यावरील भाजी, फळ विक्रेत्यांना रस्ता मोकळा करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर या रस्त्यावरील अतिक्रमण केलेली जागा विक्रेत्यांनी मोकळी केली. मात्र, त्यातील काही भाजी, फळे, फूल विक्रेते यांनी दुकानांच्या पायऱ्यांवर आपली दुकाने थाटल्याचे दिसून येत होते.

रामआळीतील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांनाही हटविण्यात आले. गोखले नाका ते विठ्ठल मंदिरपर्यंत रस्त्याच्या कडेला भाजी, फळे तसेच अन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनीही नगर परिषदेच्या निर्देशानुसार रस्ते मोकळे करून दिले.मारुती मंदिर येथील भाजी विक्रेत्या महिलांना महिनाभरापूर्वीच क्रीडांगणामागील नगर परिषदेच्या इमारतीत भाजी विक्रीसाठी जागा, गाळे उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, तेथे ग्राहकच येत नाहीत. तसेच क्रीडांगणासमोरील रस्त्यालगत अन्य भाजी विक्रेते व्यवसाय करतात, अशी भाजी विक्रेत्यांची तक्रार होती. मात्र, या कारवाईनंतर मारूती मंदिरचे विक्रेतेही आपल्या जागी परत गेले.पथकाची गस्त सुरू राहणारशहरातील अतिक्रमणे हटविण्यात आली असली तरी पुन्हा अतिक्रमणे केली जाऊ नयेत, यासाठी दररोज नगर परिषदेचे अतिक्रमणविरोधी पथक गस्त घालणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असून, त्यांचा विक्रीयोग्य मालही जप्त केला जाणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी नगर परिषदेला सहकार्य करावे व अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी