शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरच्या एचपीसीएल प्रकल्पाविरोधात एल्गार

By admin | Updated: November 18, 2015 00:05 IST

गुहागर तालुक्यातील तवसाळ, काताळे, कर्दे, दोडवली आदी गावातील परिसरात येऊ घातलेल्या एचपीसीएल रिफायनरी प्रकल्पाविरोधात येथील आठ गावांनी कर्दे गावाच्या सीमेवरील तरमळा येथे मेळावा घेऊन एल्गार फुंकले.

गुहागर : रासायनिक प्रकल्प आणून प्रकल्पाच्या नावाखाली स्थलांतरितांचे पुनर्वसन होत नाहीच, उलट ते विस्तापित होतात. कोकणाबाहेरील व्यक्तींनी कोकणाच्या विकासावर बोलू नये, तो अधिकार आम्हाला द्या, कोकणच्या निसर्गाचे संगोपन, संवर्धन करून विकास साधण्याचा सरकारने प्रयत्न करावा. मात्र, कोकणावर लादण्यात येत असलेल्या विनाशकारी प्रकल्पाविरोधात मोठी फळी उभारण्याची आज गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष अमजद बोरकर यांनी केले.गुहागर तालुक्यातील तवसाळ, काताळे, कर्दे, दोडवली आदी गावातील परिसरात येऊ घातलेल्या एचपीसीएल रिफायनरी प्रकल्पाविरोधात येथील आठ गावांनी कर्दे गावाच्या सीमेवरील तरमळा येथे मेळावा घेऊन एल्गार फुंकले. या मेळाव्यातून ते येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. मेळाव्याच्या सुरुवातीलाच येथील तवसाळ, काताळे, कर्दे, दोडवली आदी गावातील स्थानिकांजवळ कोणतीच चर्चा न करता निवडणूक जिंंकल्यावर व मंत्रीपद मिळाल्यावर अनंत गीते जिल्ह्यात जिथे संधी मिळेल तिथे तवसाळ व आजुबाजुच्या परिसरात जगातील सर्वांत मोठा प्रकल्प आणण्याचे बोलत असल्याचे त्यांनी सांगितले.कर्दे येथील अरविंंद भोळे, गिरिजा राऊत, माजी सभापती दत्ताराम निकम, प्राध्यापक सदानंद पवार, नीलेश सुर्वे, संतोष बारस्कर, सलीम मौला, इम्प्तीयाज भाटकर, महादेव माटल, संतोष माने, गणेश येद्रे, आशीर्वाद बारस्कर, मनसुर सोलकर, शंकर येद्रे, विजय नाचरे, विलास नाचरे, संजय येद्रे, विजय मोहिते यावेळी उपस्थित होते. आठ गावातील कुणबी समाजाचे मुंबई येथील युवकवर्ग तवसाळ, तवसाळखुर्द, काताळे, कर्दे, दोडवली, जांभारी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)