शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

अकरा हजार क्विंटल भात अद्याप गोदामात पडून

By admin | Updated: December 15, 2015 00:38 IST

मार्केटिंग फेडरेशन : ई - लिलावाव्दारे १३ हजार क्विंटलची विक्री

रत्नागिरी : शासनाकडून मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. मात्र, ई - लिलाव प्रक्रिया रखडल्यामुळे खरेदी केलेले भात संघाच्या गोदामात पडून होते. २४ हजार ४९८.४६ क्विंटल भातापैकी आतापर्यंत दोन टप्प्यात ई -लिलावाव्दारे १३२०४.६५ क्विंटल भाताची विक्री झाली आहे. अद्याप ११ हजार २९३.२१ क्विंटल भात शिल्लक राहिले आहे.गतवर्षी भात खरेदी करण्यात आली नसल्यामुळे दोन वर्षांपूर्वीचे भात संघाच्या गोदामात लिलाव प्रक्रियेअभावी पडून होते. दोन वर्षे भात गोदामात ठेवूनदेखील शासनाने केवळ दोन महिन्याचे भाडे देण्याचे निश्चित केल्याने संघाचे दहा महिन्यांचे भाडे बुडाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी भात खरेदीचे आदेश येऊनही भात खरेदीसाठी संघाची मानसिकता नाही. सध्या उंदीर घुशीमुळे भाताचे नुकसान होत आहे. शिवाय खरेदीनंतर ते लिलाव प्रक्रियेपर्यंत संरक्षित ठेवण्याची जबाबदारी संघाकडे असल्यामुळे आर्थिक भुर्दंड संघाला बसत आहे. यावर्षी भात खरेदीसाठी आदेश काढण्यात आले आहेत. सर्वसाधारण भातासाठी क्विंटलला १४१० रुपये, तर ‘अ’ वर्गातील भातासाठी क्विंटलला १४५० रुपये दर निश्चित केला आहे. यावर्षीपासून २०० रूपये बोनस मात्र शासनाने रद्द केला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य पीक भात आहे. परंतु जिल्ह्यात भाताची प्रोसेसिंग मिल नसल्यामुळे रायगड व कोल्हापूर जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागते. प्रोसेसिंग मिलधारकदेखील वाहतूक खर्च, मिलिंग खर्च एकत्र करून टेंडर सादर करतो. परंतु दरामुळे प्रोसेसिंग प्रक्रियाच रखडली होती. शासनाकडून दोन वर्षांपूर्वी दि मार्केटिंग फेरडेशनच्या माध्यमातून भात खरेदी केली. परंतु संबंधित भात अद्याप खरेदी - विक्री संघाच्या गोदामात पडून राहिल्यामुळे उंदीर आणि घुशीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरेदी केलेले व शिल्लक भात यामध्ये तफावत आहे. (प्रतिनिधी)लिलाव झालेले भात (क्विंटलमध्ये)मिरवणे२०२१.२०आकले४४३.६०खेड४५३०शिरळ१५०१.१०राजापूर१७९२.८०गोदामात असलेले भात (क्विंटलमध्ये)निवळी५६०.४०केळशी१०७७.०१गुहागर१६५९.६०रत्नागिरी११०५.६०संगमेश्वर२५०७.६०पाचल९९४.८०