शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

वीज पडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 9:50 PM

वीज अंगावर पडून १२ वर्षांचा एक मुलगा मृत्युमुखी पडला.

देवरुख : वीज अंगावर पडून १२ वर्षांचा एक मुलगा मृत्युमुखी पडला. हृदयाला चटका लावणारी ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास देवरुखनजीकच्या नांदळज बौद्धवाडी येथे घडली. सुशांत विश्वास कांबळे असे त्याचे नाव आहे. सुशांत ताम्हाणे शाळेचा सातवीतील विद्यार्थी होता. तो घराच्या पडवीत बसलेला असताना वीज पडली आणि ही दुर्घटना घडली.

संगमेश्वर तालुक्यात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह काही गावात पाऊस चांगलाच कोसळला. नांदळज बौद्धवाडी येथील सुशांत हा सायंकाळी घराच्या पडवीत बसलेला होता. यावेळी आलेल्या विजेचा लोळ पडवीच्या दिशेने आला. यात सुशांत हा खाली कोसळला. सुशांतला तत्काळ त्याच्या नातेवाईकांनी देवरुख ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी सांगितले. घटनास्थळी जाऊन तलाठी गावित यांनी पंचनामा केला. सुशांतच्या जाण्याने ताम्हाने पंचक्रोशीवासीयांना चटका बसला आहे.