शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे मार्गावर लवकरच धावणार विजेवरील गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 17:22 IST

Konkan Railway Ratnagiri -कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते रोहा विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, बुधवारी या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांच्याकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान रत्नागिरीतून दुपारी ३ वाजता सात डब्यांची रेल्वे विजेवर चालविण्यात आली. या पथकाचा अहवाल आल्यानंतर काही दिवसातच या मार्गावरून विजेवरील गाड्या धावणार आहेत.

ठळक मुद्देसुरक्षा आयुक्तांची तपासणी, अहवालाची प्रतीक्षा रत्नागिरी ते रोहा वाहतुकीचा मार्ग मोकळा

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते रोहा विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, बुधवारी या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांच्याकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान रत्नागिरीतून दुपारी ३ वाजता सात डब्यांची रेल्वे विजेवर चालविण्यात आली. या पथकाचा अहवाल आल्यानंतर काही दिवसातच या मार्गावरून विजेवरील गाड्या धावणार आहेत.रोहा ते रत्नागिरी या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर २५ फेब्रुवारीला पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर काही दुरुस्त्याही इंजिन चालवून करण्यात आल्या होत्या. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (कमिशनर ऑफ सेफ्टी) मालवाहतूक आणि प्रवासी गाड्या चालविण्याची परवानगी देण्यात येते.

मध्य रेल्वेचे हे सुरक्षा पथक बुधवारी रत्नागिरीत दाखल झाले. रोहा येथून सात डब्यांची गाडी डिझेल इंजिन लावून रत्नागिरी रेल्वे स्थानकात आणली गेली. रत्नागिरीतून ती दुपारी ३ वाजता विजेवर चालवत रोह्याकडे रवाना झाली. यामध्ये इलेक्ट्रिक विभागासह सुरक्षा पथकातील तज्ज्ञ अधिकारी सहभागी झालेले आहेत. गाडी रोह्याला पोहचल्यानंतर सीआरएस पथकाचा अहवाल कोकण रेल्वेला प्राप्त होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते बेंगलोर या टप्प्याच्या विद्युतीकरणासाठी केंद्र शासनाने ११०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार वेर्णा येथून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. रत्नागिरी ते रोहा २०४ किलोमीटरच्या विद्युतीकरणाला डिसेंबर २०१८ मध्ये आरंभ झाला. विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर उपकेंद्र यासह टनेल पूल येथून वीजवाहिन्या, विद्युत खांब उभारले आहेत. वाहिन्यांमधून करंट सोडण्याची चाचणी २२ फेब्रुवारीला झाली. त्यानंतर आता सीआरएस तपासणी केल्यामुळे प्रत्यक्षात वाहतूक सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पहिली मालगाडी धावणारकोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना महिनाभरात विजेवर गाड्या सुरु होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानुसार कार्यवाही सुरु असून, आयुक्तांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पहिली मालगाडी चालविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी