शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मुंबई-गोवा महामार्गावरील दुसरी मार्गिका डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न - मंत्री रवींद्र चव्हाण

By मनोज मुळ्ये | Updated: September 12, 2023 16:19 IST

दिलेल्या आश्वासनानुसार या बोगद्यातील एक मार्गिका सुरू

रत्नागिरी : मुंबईगोवामहामार्गाच्या चौपदरीकरणातील दुसरी मार्गिका डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणे हे एक आव्हानच आहे. महामार्गावरील सर्व पूल, त्यांचे ऑडिट हे काम सोपे नाही. मात्र तरीही ते कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे उद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले.मंत्री चव्हाण यांनी मंगळवारी मुंबईगोवा महामार्गाची विशेषतः कशेडी बोगद्याची पाहणी केली. त्यांनी याआधीच्या पाहणीप्रसंगी दिलेल्या आश्वासनानुसार या बोगद्यातील एक मार्गिका सुरू झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात मुंबईहून येणारे चाकरमानी या मार्गिकेचा वापर करू शकतील. या कामाची मंत्री चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.महामार्गावरील पुलांचे काम अजून बाकी आहे. जे काम अर्धवट झाले आहे त्याचे ऑडिट करणे, ते योग्य आहे की नाही तपासणे आणि त्यानंतर उर्वरित काम करणे ही बाब सोपी नाही. मात्र सकारात्मक पद्धतीने विचार करून डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. मंत्री चव्हाण यांनी यावेळी बोगद्यातून रवाना होणाऱ्या वाहन चालकांना हात दाखवून शुभेच्छाही दिल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्ग