शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

उत्तरेकडील वाऱ्याचा मासेमारीवर परिणाम; समुद्रातील मासळी गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 17:41 IST

रत्नागिरी : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. या वाऱ्यांमुळे समुद्रातील मासे गायब झाले असून, गिलनेटने मासेमारी ...

रत्नागिरी : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. या वाऱ्यांमुळे समुद्रातील मासे गायब झाले असून, गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांनी नौका बंदरातच उभ्या करून ठेवल्या आहेत. तर ट्रॉलिंग, फिशिंगच्या नौकाही परिस्थिती पाहून समुद्रात जात आहेत.यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला मच्छीमारांना मासळी मिळत होती. मात्र, नैसर्गिक संकटांमुळे मासेमारीवर परिणाम हाेऊ लागला. त्यामुळे बहुतांशी वेळा मासेमारी ठप्पच राहत हाेती. गेले अनेक दिवस किनारपट्टी भागात गार वारे वाहू लागले आहेत. वेगवान वाऱ्यामुळे समुद्रात मासेमारीकरिता गेलेल्या मच्छीमारांची तारांबळ उडत आहे. छोट्या मच्छीमारांना मासे पकडण्यासाठी टाकलेली जाळी ओढताना त्रास होत असून, नौका कलंडण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक मच्छीमार माघारी परतले आहेत. काहींनी जवळच्या बंदरात व खाडीत सुरक्षिततेसाठी आधार घेतला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही परिस्थिती अजून दोन दिवस राहणार आहे. ट्रॉलिंगने मासेमारी करणारे मच्छीमार धोका पत्करून समुद्रात जात आहेत. पण, नौका स्थिर राहत नसल्यामुळे जाळी टाकता येत नाही. या कालावधीत मासेही मिळत नसल्याने मच्छीमारांची अडचण हाेत आहे. वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून, मासळी खोल समुद्रात गेली आहे. त्यामुळे अनेकांनी नाैका बंदरातच ठेवल्या आहेत. समुद्रात वाहणारे वारे थांबण्याची प्रतीक्षा मच्छीमारांना आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार