शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ओखी वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीचे नुकसान, बोटींनी टाकला बंदरात नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 13:44 IST

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं आहे. पावसाळ्यात जितकं पाणी चढतं तेवढं पाणी किनाऱ्यांच्या भागात चढलं आहे. त्याचबरोबर लाटांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागातील गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात आलेल्या ओखी वादळाने कोकण किनारपट्टीवरही परिणाम जाणवू लागले आहेत

ठळक मुद्देहर्णे - बुरोंडी या बंदरातील मच्छिमार बोटी सुरक्षित स्थळी जयगड - दाभोळ - आंजर्ले - बाणकोट खाडीत अनेक बोटीने टाकला नांगर समुद्राच्या पाण्याला जोरदार करंट पुढील दोन दिवस वादळाचा धोका कायम

रत्नागिरी, दि. ४  : रत्नागिरी जिल्ह्यात अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं आहे. पावसाळ्यात जितकं पाणी चढतं तेवढं पाणी किनाऱ्यांच्या भागात चढलं आहे. त्याचबरोबर लाटांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागातील गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात आलेल्या ओखी वादळाने कोकण किनारपट्टीवरही परिणाम जाणवू लागले आहेत समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याला जोरदार करंट आहे,  समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने  पुढील दोन दिवस सतर्कता बाळगण्याच्या इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील हर्णे - बुरोंडी बंदरातील मच्छिमार बोटी सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या असून अनेक बोटी जयगड - दाभोळ - आंजर्ले - बाणकोट खाडीत नांगर टाकून उभ्या आहेत.दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यांवर मध्यरात्री मोठी भरती आल्याने समुद्र किनाऱ्यांवरील अनेक   दुकाने समुद्रात वाहून गेली.  दक्षिणेकडे समुद्रात आलेल्या ओखी वादळाने कोकण किनारपट्टीवरही परिणाम जाणवू लागले आहेत.

कोकण किनारपट्टीवर रात्री उशिरा आलेल्या मोठ्या भरतीत ठिकठिकाणी नुकसान झाले असून मुरुड, हर्णे समुद्र किनाऱ्यांवरील दुकाने व छोट्या होडींचे मोठे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील समुद्राच्या पाण्याला जोरदार करंट मारत असून पुढील दोन दिवस वादळाचा धोका कायम असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, दापोली तालुक्यातील हर्णे - बुरोंडी या बंदरातील मच्छिमार बोटी सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या असून अनेक बोटीने जयगड - दाभोळ - आंजर्ले - बाणकोट खाडीत नांगर टाकला आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी