शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणामुळे माती रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:09 IST

मुसळधार पावसामुळे रस्त्यावर माती आल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील राजापूर ते हातीवले या रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात माती रस्त्यालगत आहे. काही ठिकाणी डायव्हर्शनमुळे मातीचा रस्ता वापरावा लागत आहे.

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणामुळे माती रस्त्यावरपावसाळ्यात माती रस्त्यावर येणार, अपघाताची भीती अधिक

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रस्त्यावर माती आल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील राजापूर ते हातीवले या रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात माती रस्त्यालगत आहे. काही ठिकाणी डायव्हर्शनमुळे मातीचा रस्ता वापरावा लागत आहे.सोमवारी सायंकाळी पडलेल्या पावसामुळे माती रस्त्यावर आली आहे. या मातीमुळे गाड्यांचे टायर स्लिप होत असल्याने राजापूर ते हातिवलेदरम्यान अनेक गाड्या चढावात थांबल्या होत्या. या भागात वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. मध्यरात्री उशिरापर्यंत गाड्या संथगतीने या मार्गावरून जात होत्या.गेल्याच महिन्यात अचानक कोसळलेल्या पावसामुळे लांजा तालुक्यातील वाकेड घाटात माती रस्त्यावर आली होती. त्यामुळे याठिकाणीदेखील वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गाच्या कामामुळे रस्त्यालगत ठेवण्यात आलेली माती पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येण्याचा धोका आहे. रात्रीच्यावेळी ही माती रस्त्यावर आल्यास अपघाताची शक्यता अधिक आहे. रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आलेली माती बाजूला न केल्याने ती रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा होणार आहे.वाहने सावकाश हाकामुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात मातीचे ढिग रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आले आहेत. ही माती पावसाळ्यात रस्त्यावर येण्याचा धोका आहे. त्यामुळे रस्ता निसरडा होऊन वाहने घसरण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहने सावकाश चालविणे आवश्यक आहे.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग