शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या लग्नासाठी आलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:22 IST

मित्राच्या लग्नाला मुंबईहून बँन्जो पार्टी घेऊन आलेल्या ग्रुपमधील अंघोळीसाठी नदीवर गेलेल्या एका ३५ वर्षीय प्रौढाला फिट येवून तो पाण्यात बुडून मृत्यू ओढवल्याची घटना रविवारी सकाळी बेनीमाळ येथे घडली आहे .

ठळक मुद्देमित्राच्या लग्नासाठी आलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यूफिट येवून मृत्यू ओढवल्याची घटना

लांजा : मित्राच्या लग्नाला मुंबईहून बँन्जो पार्टी घेऊन आलेल्या ग्रुपमधील अंघोळीसाठी नदीवर गेलेल्या एका ३५ वर्षीय प्रौढाला फिट येवून तो पाण्यात बुडून मृत्यू ओढवल्याची घटना रविवारी सकाळी बेनीमाळ येथे घडली आहे .पनोरे येथील विनोद विष्णू मोर्ये हे नोकरीनिमित्ताने मुंबई येथे राहत असून विनोद यांचे लग्न गावी पनोरे येथे रविवारी होते. त्यासाठी त्याच्या मित्रांची मुंबईत बँन्जो पार्टी असल्याने विनोद यांनी त्यांना लग्नाला बँन्जो वाजविण्याची आॅर्डर दिली होती. मुंबई येथील विविध भागामध्ये राहणाऱ्या दहा मित्रांचा ग्रुप दि. १० मे रोजी रात्री पनोरे येथे येण्यासाठी निघाला.मुंबई दादर येथून त्यांनी खाजगी गाडी करून ते दि. ११ मे रोजी दुपारी २.३० वाजता पनोरे येथे आले होते. त्यानंतर आराम केला व रात्री हळदीचा कार्यक्रम असल्याने बँन्जो वाजविला.रविवारी लग्न असल्याने सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्याने सहा मित्र अंघोळीसाठी मुचकुंदी नदी पात्रात बेनी माळ येथे अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले होते. सर्व मित्र छातीभर पाण्यात अंघोळ करीत असताना मनोज वामन राणे (३५, साई नगर अपार्टमेंट सुबाई कंपाऊंड नायर गणपती मंदिर विलसावरक विरार) हाही छातीएवढ्या पाण्यात अंघोळ करीत असताना त्यांला फिट आल्याने तो पाण्यात बुडाला.सर्व मित्र अंघोळी करण्यात दंग असल्याने मनोज यांच्याकडे त्यांचे लक्ष नव्हते. अंघोळी करून झाल्यानंतर सर्वजण पाण्याच्या बाहेर आल्यानंतर त्यांना मनोज राणे दिसला नाही. त्यांनी त्यांचा शोध घेतला मात्र तो कुठे सापडत नसल्याने मित्रांनी ओरडून बेनी येथील ग्रामस्थ मनोज महादेव कोंडसकर यांना बोलावून मनोज राणे यांचा शोध घेण्यास सांगीतले.

त्यानुसार मनोज कोंडसकर यांनी नदी पात्रात उतरून त्याचा शोध घेतला असता उंच पाण्यात पुलाच्या पिलरजवळ मनोज राणे सापडला त्याला पाण्याच्या बाहेर काढला असता त्यांच्या नाका तोंडातून रक्त व फेस येत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र साटवली येथे उपचारासाठी नेण्यात आले.

मात्र साटवली येथील आरोग्य केंद्र्र बंद असल्याने लांजा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टर यांनी तपासले असता मनोज हा मृत असल्याचे घोषित करण्यात आले.

मनोज राणे यांचा बुडून मृत्यू झाल्याची खबर त्याचा मित्र सुभाष भिकाजी डांबरे (३०, मुंबई गोरेगाव) यांनी पोलिसांना दिल्यावरून पोलिस उपनिरीक्षक पी. व्ही. पाटील यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. अधिक तपास सुनील चवेकर हे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी