शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मोरी खचल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 13:45 IST

बुधवारी संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावर वाकेड येथे टाकण्यात आलेल्या मोरीचा भराव पावसाच्या पाण्याने खचल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासी व वाहनचालक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने दगड टाकून भराव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

ठळक मुद्देमोरी खचल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्पकुवे येथे भराव खचल्याने ट्रक अडकून पडला

लांजा : बुधवारी संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावर वाकेड येथे टाकण्यात आलेल्या मोरीचा भराव पावसाच्या पाण्याने खचल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासी व वाहनचालक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने दगड टाकून भराव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.मुंबई - गोवा महामार्गावर सध्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. वाकेड घाटात मोठ्या प्रमाणात असलेले डोंगर कटींग करण्यात आले आहेत. तसेच महामार्गाचे रुंदीकरणासाठी दगड व मातीचा भराव टाकण्यात आला आहे.

याआधी दिवाळीत पडलेल्या पावसात वाकेड येथे चिखल माती रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर दिनांक १३ जून रोजी कुवे येथे मोरीचा भराव खचल्याने ट्रक अडकून पडला होता. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

बुधवारी सायंकाळी ४ वाजता मुसळधार पावसाने सुरुवात केली आणि पावसाचे पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने वाकेड येथे टाकण्यात आलेल्या मोरीवरील मातीचा भराव खचला व माती पाण्याने वाहून गेल्याने दोन्ही साईडची वाहतूक ठप्प झाली.दरम्यान, बुधवारी सायंकाळी ५ वाजता वाकेड येथील मोरी खचली आणि मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जवळपास तीन तास ही वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.घटनास्थळी वाकेड सरपंच संदीप सावंत, जयवंत भितळे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबी व महामार्गाचे ठेकेदार यांना बोलावून युध्दपातळीवर भराव भरण्याचे काम सुरू केले. यावेळी वाटूळ मार्र्गे वाहतूक वळविण्यात आली होती. रात्री सव्वाआठच्या सुमारास महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली. 

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी