राजापूर : मातीच्या भरावावर चढून पलटी झालेल्या टेम्पोतून स्वत:ला वाचण्यासाठी गाडीतून बाहेर उडी मारणाऱ्या चालकाचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील उन्हाळे कुंभारवाडीनजीक घडली.दिलीपकुमार नरेश सिंह (वय २३, रा. शेहूचंदपूर, बेगनी, उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव असून, हा अपघात रविवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान घडला. गोवा वेर्णे येथून केबल भरून हा टेम्पो उत्तर प्रदेशकडे जात होता. टेम्पोचालक दिलीपकुमार नरेश सिंह व क्लीनर अनुज सिंह असे दोघेजण या टेम्पोत होते.रविवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास टेम्पो राजापूर तालुक्यातील उन्हाळेनजीक आला असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाला बाजू देताना चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला व टेम्पो रस्त्याच्या लगत असलेल्या मातीच्या भरावावर चढला. याच दरम्यान अपघातातून वाचण्यासाठी टेम्पोचालक दिलीपकुमार नरेश सिंह याने टेम्पोबाहेर उडी मारली. मात्र, भरावावर चढलेला टेम्पो तेवढ्याच गतीने मागे आल्याने या टेम्पोखाली चिरडून चालक दिलीपकुमार याचा जागीच मृत्यू झाला.अपघात झाल्याचे कळताच लगतच्या नागरिकांनी अपघातस्थळी तातडीने धाव घेतली व क्लीनरला वाचविले. या अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल कमलाकर तळेकर, सचिन बळीप तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृत चालकाचा मृतदेह तत्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कमलाकर तळेकर करत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर टेम्पोखाली चिरडून चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:23 IST
Accident Ratnagirinews- मातीच्या भरावावर चढून पलटी झालेल्या टेम्पोतून स्वत:ला वाचण्यासाठी गाडीतून बाहेर उडी मारणाऱ्या चालकाचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील उन्हाळे कुंभारवाडीनजीक घडली.
मुंबई-गोवा महामार्गावर टेम्पोखाली चिरडून चालकाचा मृत्यू
ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावरील उन्हाळे येथील घटना वाचण्यासाठी उडी मारली तरीही घात, क्लिनरला वाचविण्यात यश