शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धरणसाठा बाष्पीभवनाच्या कचाट्यात

By admin | Updated: March 30, 2016 23:59 IST

रत्नागिरी एमआयडीसी : अनेक नळपाणी योजनांचे भवितव्य निसर्गाच्या हाती...

 रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरातील सात ग्रामपंचायतींना पूर्णत: आणि नगरपरिषदेला अंशत: पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या पाचपैकी घाटीवळे धरणातील पाणी आटले आहे, तर नादुरुस्तीमुळे असोडे धरणात पाणीसाठा अल्प आहे. उर्वरित तीन धरणात जूनच्या पूर्वार्धापर्यंत पुरेलएवढा साठा असला तरी वाढलेल्या तापमानामुळे हा पाणीसाठा बाष्पीभवनाच्या कचाट्यात सापडल्यास या सर्व ग्रामपंचायतींना टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यापासून रत्नागिरीचा पारा ३६ अंशांच्यावर गेला आहे. पारा उतरत नसल्याने तापमानातील वाढ स्थिर आहे. उन्हामुळे काहिली होत असताना धरणात असलेल्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. तापमान असेच वाढत राहिले, तर बाष्पीभवनाच्या संकटात पाणीसाठा सापडेल व टंचाई अधिक भीषण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे मिरजोळे औद्योगिक क्षेत्रासह मिरजोळे गाव, कुवारबाव, नाचणे, कर्ला, शिरगाव, मिऱ्या, शिरगाव या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच रत्नागिरी नगरपरिषदेला दररोज १५०० घनमीटर पाणीपुरवठा होतो. या ७ ग्रामपंचायती एमआयडीसीच्या पाण्यावर पूर्णत: अवलंबूून आहेत. या ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठ्याचा दुसरा पर्याय अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे एमआयडीसीच्या पाणी साठ्यात कपात झाली की, वितरणात कपात करणे भाग पडते. तशी शक्यता सध्यातरी दिसून येत नाही, असे सुत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, तापमानातील वाढ अशीच राहिली वा त्यापेक्षा वाढ झाली तर बाष्पीभवनाचे संकट निर्माण होण्याची भीती आहे. सन २०१३मध्ये एमआयडीसीच्या धरणांतील पाणीसाठाच मार्चमध्ये संपला होता. त्यामुळे या सातही ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांवर विपरित परिणाम झाला होता. कुवारबावमध्ये तर आठवड्याने नळाला पाणी सोडले जात होते. २०१४मध्येही कुवारबावमध्ये जलवाहिनी फुटल्याने व ती दुरुस्त करण्यात १५ दिवस वाया गेल्याने कुवारबाववासीयांची पाण्यासाठी फरपट झाली होती. २०१५मध्ये तसा त्रास झाला नाही. मात्र, यावर्षी घाटीवळे धरणातील पाणीसाठा संपला आहे. असोडे धरण बऱ्याच काळापासून नादुरुस्त आहे. त्याची डागडुजी केलेली नाही. या धरणाची डागडुजी झाली असती तर त्यात चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला असता, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या धरणात पाणीसाठा अल्प आहे. आंजणारी, निवसर व हरचेरी या तीन कोल्हापूर पध्दतीच्या धरण प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. हा साठा येत्या जून मध्यापर्यंत पुरेल असा एमआयडीसीचा अंदाज आहे. मात्र तापमानातील वाढ कशी राहणार यावर धरणांमधील पाणी साठ्याची पातळी अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी) पाणी अडवण्यासाठी एमआयडीसीने बांधलेले हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे जुने आहेत. अनेक वर्षांपूर्वी ते बांधण्यात आले होते. हरचेरी १९७२, निवसर १९९५, असोडे १९८२, अंजणारी २००१, घाटीवळे १९९२ या साली उभारलेले ्रबंधारे आहेत. त्यांची दुरुस्ती व देखभालही करावी लागते.