शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी नको, मराठा म्हणूनच आरक्षण हवे; रत्नागिरीतील मराठा समाजाच्या बैठकीत एकमुखी निर्धार

By अरुण आडिवरेकर | Updated: November 3, 2023 17:14 IST

गावा-गावात जाऊन जागृती करणार

रत्नागिरी : आम्हाला कुणबी-मराठा नकाे तर मराठा आरक्षण दिले तरच आरक्षण घेऊ, असा निर्धार रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी रत्नागिरी तालुका मराठा संघटना स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.रत्नागिरी शहरातील माळनाका येथील मराठा भवन येथे गुरुवारी (२ नाेव्हेंबर) सायंकाळी रत्नागिरी तालुका समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत मनाेज जरांगे पाटील यांच्या आंदाेलनाला एकमुखाने पाठिंबा देण्यात आला. मात्र, कुणबी मराठा प्रमाणपत्र घेण्यास विराेध दर्शविण्यात आला. समाज एकसंघ ठेवण्यासाठी आणि त्याची ताकद दाखविण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे. त्यासाठी संघटना स्थापन करायची का, यावर चर्चा करण्यात आली. यावेळी आप्पा देसाई, केशवराव इंदुलकर, राकेश नलावडे, सुधीर भोसले, भाऊ देसाई, कौस्तुभ सावंत, संतोष सावंत उपस्थित होते.संघटना स्थापन करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर रत्नागिरी तालुका मराठा संघटना स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यासाठी लवकरच एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत गावा-गावात जाऊन जागृती करण्याचे ठरविण्यात आले.सुधीर भोसले यांनी मराठा आरक्षण का हवे, यावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एकमताने पाठिंबा दर्शविण्यात आला. परंतु, मराठा-कुणबी प्रमाणपत्र घेण्यास या बैठकीत विरोध करण्यात आला. ९६ कुळी मराठा आहोत. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र घेण्यास विरोध असल्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला. कुणबी मराठा असे आरक्षण नकाे तर मराठा म्हणूनच आरक्षण हवे, असेही यावेळी ठरविण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaratha Reservationमराठा आरक्षण