शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

कोकोबद्दल विद्यापीठाने संशोधन करावे

By admin | Updated: February 20, 2016 00:39 IST

दीपक केसरकर : वेंगुर्ले फळसंशोधन केंद्रात काजूपिक विकासासंदर्भात राष्ट्रीय परिषद

सिंधुदुर्गनगरी : कोकणात उत्पादन होत असलेले काजू-बोंडू आज वाया जात आहेत. त्यासाठी काजू बोंडांवर प्रक्रिया करुन बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोकणात कोकोचे चांगले उत्पादन होते. त्यामुळे येथील नारळ, सुपारी बागेत आंतरपिक म्हणून कोकोची लागवड करण्याबाबत विद्यापीठाने संशोधन हाती घ्यावे, असे आवाहन वित्तमंंत्री दीपक केसरकर यांंनी राष्ट्रीय काजू परिषदेत बोलताना केले.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, काजू आणि कोको विकास संचालनालय कोची आणि नाबार्डतर्फे वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या काजूपीक विकासासंबंधीच्या राष्ट्रीय परिषदेत वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री केसरकर बोलत होते. परिषदेचे उद्घाटन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर खासदार विनायक राऊत, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य, काजू व कोको विकास संचनालय कोचीचे डॉ. पी. एल. सरोज, विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्राचे सहयोगी संचालक डॉ. भरत साळवी, डॉ. व्यंकटेश हुबळीकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश नाईक, उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, पंचायत समिती सदस्य उमा मठकर, समाधान बांदवलकर, सुनिल मोरजकर, जिल्हा परिषद सदस्य सुकन्या नरसुले, जयप्रकाश चमणकर, सुरेश भोसले, दीपक कुबल, चंद्रकांत गडेकर, सचिन वालावलकर, राजन वालावलकर, विवेकानंद आरोलकर, सुनिल वालावलकर आदी उपस्थित होते. यावेळी माजी सहयोगी संशोधन संचालक डॉ. आर. टी. गुंजाटे, डॉ. यदुकुमार, महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच काजू परिषदेवर आधारीत विविध संशोधकांनी लिहिलेल्या संशोधनपर लेखांच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री. केसरकर बोलताना पुढे म्हणाले, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने काजूच्या विविध जाती विकसीत केल्या. मात्र, काजू बोंडू वाया जात आहे. या बोंडावर सखोल संशोधन होऊन काजू बोंडापासून नविन प्रक्रियायुक्त पदार्थ करण्यात यावे जेणेकरुन शेतकऱ्यांना काजू बी बरोबरच अतिरिक्त उत्पादन मिळू शकेल. सिंधुदुर्ग जिल्हा विविधतेने नटलेला आहे. याठिकाणी विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आढळून येतात. या औषधी वनस्पतीपासून आयुर्वेदिक औषधी तयार करण्यास भरपूर वाव आहे. काजू पिकाच्याबाबतीत आंतरपिक म्हणून दुसरे पिक घेण्याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल अहिरे यांनी केले तर आभार वेंंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. आर. साळवी यांनी मानले. परिषद यशस्वीतेसाठी डॉ. बी. एन. सावंंत, डॉ. आर. सी. गजभिये, प्रा. सी. एम. तल्ला यांनी परिश्रम घेतले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत काजूपीक सुधारणा, काजूपीक व्यवस्थापन, बदलते वातावरण व त्या अनुषंगाने तंत्रज्ञानाचा अवलंब, काजूपीक मूल्यवर्धनासाठी मूल्यवर्धन साखळी व्यवस्थापन, काजूपीकावरील किड व रोग, हवामानानुसार त्यांचे नियंत्रण आणि काजूपीक विकासाचे सामाजिक व आर्थिक घटक या विषयावर तांत्रिक सत्रे होणार आहेत. (प्रतिनिधी)तपस भट्टाचार्य : काजूची नवीन जात विकसित करण्यासाठी संशोधनकुलगुरु तपस भट्टाचार्य बोलतांना म्हणाले की, व्हिएतनाम हा देश काजू उत्पादनात अग्रेसर आहे. भारतातील काजू उत्पादनात वाढ होण्याकरीता काजू उत्पादक शेतकरी काजू बागेत अवलंंंब करीत असलेले तंत्रज्ञान व सध्या विद्यापिठामार्फत उपलब्ध तंत्रज्ञान यात जेथे कुठे कमतरता असतील त्या शोधून शेतकऱ्यांची गरज ओळखून विद्यापिठामार्फत संशोधन केले जावे. याचबरोबर काजूचे शाश्वत उत्पादन घेण्याच्याबाबतीत विद्यापीठ विचार करीत आहे. काजूच्या घन लागवडीकरीता काजूची नविन जात विकसित करण्याच्या संशोधनावर लक्ष दिले जाणार आहे. काजूच्या बोंडावर सखोल संशोधन करुन त्यापासून शेतकऱ्यांना जास्तीत उत्पन्न मिळवून देण्याचा विद्यापीठ प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले.‘फळ संशोधन’चे कार्य कौतुकास्पद : राऊतखासदार विनायक राऊत म्हणाले की, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे कार्य कौतुकास्पद आहे. काजूच्या बाबतीत केंद्राने दिलेले योगदान देशपातळीवरच नव्हे तर विदेशात वाखाणले जात आहे. आज येथे होत असलेल्या राष्ट्रीय काजू परिषदेतील चर्चेअंती शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारीत असे नविन संशोधन उपलब्ध होईल अशी आशा राऊत यांनी व्यक्त केली.