शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

Divyang - दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी आस्थाचा अविरत लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 17:56 IST

Divyang, ratnagirinews आपल्या स्वमग्न मुलाचे पालनपोषण आयुष्यभर करावयाचे आहे, त्यादृष्ष्टीने प्रयत्न करतानाच इतर अशा मुलांसाठी प्रयत्न करायला हवेत, या उद्देशाने सुरेखा पाथरे यांनी २०१३ साली आस्था सोशल फाऊंडेशनची निर्मिती केली. ही संस्था अशा मुलांना स्वावलंबी बनवतानाच दिव्यांगांच्या सन्मान आणि स्वावलंबनासाठी अव्याहत कणखरपणे लढा देत आहे.

ठळक मुद्देदिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी आस्थाचा अविरत लढासमान संधी, आत्मसन्मान मिळण्यासाठी धडपड

शोभना कांबळेरत्नागिरी : आपल्या स्वमग्न मुलाचे पालनपोषण आयुष्यभर करावयाचे आहे, त्यादृष्ष्टीने प्रयत्न करतानाच इतर अशा मुलांसाठी प्रयत्न करायला हवेत, या उद्देशाने सुरेखा पाथरे यांनी २०१३ साली आस्था सोशल फाऊंडेशनची निर्मिती केली. ही संस्था अशा मुलांना स्वावलंबी बनवतानाच दिव्यांगांच्या सन्मान आणि स्वावलंबनासाठी अव्याहत कणखरपणे लढा देत आहे.आपल्या स्वमग्न मुलाच्या, आल्हादच्या पालनपोषणासाठी सुरेखा पाथरे यांनी जिल्हा परिषदेतील अधिकारीपदाच्या नोकरीचाही त्याग केला. पण त्या स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी इतर मुलांसाठीही काम सुरू केले. २०१३ साली त्यांनी रत्नागिरीतच शिवाजी स्टेडिअम येथील गाळ्यात ६ वर्षाखालील मुलांसाठी अपंगत्वाचे शीघ्र निदान व उपचार केंद्र सुरू केले. त्यानंतर ६ वर्षावरील मुलांसाठीही थेरपी सेंटर सुरू केले. या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, समावेशक शिक्षणावर भर देत स्वत: ग्रुप थेरपी सेंटरबरोबरच विशेष शिक्षण केंद्र सुरू केले. आज या केंद्रात जिल्हाभरातील ३२ मुले आहेत.हे करतानाच या मुलांचे पालक आणि इतर दिव्यांग यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आस्था दिव्यांग हेल्पलाईन सुरू केली. त्याद्वारे बस, रेल्वे पास आदी समस्या सुटल्या. आस्था दिव्यांग वकालत केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांच्या ५ टक्के निधीचा प्रश्न मार्गी लावला. दिव्यांगांना वाहन परवानासाठी रत्नागिरीतच फिटनेस सर्टिफिकेट मिळू लागले आहे. कर्णबधिरांनाही श्रवण चाचणीवर फिटनेस सर्टिफिकेट मिळू लागले आहे. आस्थामुळे ३,७७० कुटुंबांना धान्याचा अधिकार मिळाला आहे.यात महत्त्वाचे म्हणजे पाच टक्के राखीव निधी नियंत्रण समितीवर आस्थाची निवड झाली आहे. त्यामुळे या निधीचे योग्यप्रकारे नियोजन होण्यासाठी संस्था आग्रही असते. अथक प्रयत्नाने रत्नागिरीत तीन वर्षांपासून दिव्यांगांच्या जिल्हा क्रीडा स्पर्धा होत आहेत. विशेष म्हणजे या संस्थेचे ९० टक्के कर्मचारी दिव्यांग आहेत.

टॅग्स :Divyangदिव्यांगRatnagiriरत्नागिरी