शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

Divyang - दिव्यांग दिनी दोघांना मिळाले स्वप्नातील घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 18:30 IST

Chiplun Nagar Parishad, Ratnagiri, Home, Diyang जन्मतःच अपंगत्व आल्यानंतर आयुष्यात स्वप्नातले घर होईल की नाही, अशी रुखरुख कायम मनात असायची. परंतु, चिपळूण नगर परिषदने आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात दिल्याने शहरातील मुरादपूर येथील दोघांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्याहस्ते गुरुवारी या दोन्ही वास्तूंचे उद्घाटन करत दिव्यांग कुटुंबियांना दिव्यांग दिनी अनोखी भेट देण्यात आली.

ठळक मुद्देदिव्यांग दिनी दोघांना मिळाले स्वप्नातील घर चिपळूण-मुरादपूर येथील घरकुलाचे उद्घाटन, कुटुंबीय भारावले

चिपळूण : जन्मतःच अपंगत्व आल्यानंतर आयुष्यात स्वप्नातले घर होईल की नाही, अशी रुखरुख कायम मनात असायची. परंतु, चिपळूण नगर परिषदने आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात दिल्याने शहरातील मुरादपूर येथील दोघांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्याहस्ते गुरुवारी या दोन्ही वास्तूंचे उद्घाटन करत दिव्यांग कुटुंबियांना दिव्यांग दिनी अनोखी भेट देण्यात आली.दरवर्षी चिपळूण नगर परिषदेकडून अर्थसंकल्पाच्या ५ टक्के राखीव निधीतून दिव्यांगांना आर्थिक सहाय्य केले जाते. त्यासाठी संबंधितांकडून प्रस्ताव मागविण्यात येतात. यावर्षीही प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार शहरातील मरादपूर येथील प्रशांत घाडगे, अरविंद गोरिवले यांनी घरकुलसाठी प्रस्ताव सादर केला होता.

त्यांना २.५० ते ३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून दोघांनीही घरकुलाचे काम पूर्ण केले आहे. हे काम आधीच पूर्ण झाले होते. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे मुहूर्त लांबला. अखेर गुरुवारी या घरकुलांचे उद्घाटन करण्यात आले.त्याचबरोबर ९३ हजार रुपये किमतीची मोटारसायकल सुगंधा कांबळी, विजया कुलकर्णी, मीनाक्षी वटकर, प्रशांत घाडगे, रेखा राजेशिर्के, अरविंद गोरिवले या दिव्यांगांना देण्यात आली. त्यांना मोटारसायकलच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासमवेत मुख्याधिकारी वैभव विधाते, नगरसेविका वर्षा जागुष्टे, रसिका देवळेकर, शिवानी पवार, संजीवनी शिगवण, नगरसेवक आशिष खातू, परिमल भोसले, रश्मी गोखले उपस्थित होते.

टॅग्स :Divyangदिव्यांगChiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदRatnagiriरत्नागिरीHomeघर