रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात होतो. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सप्टेंबरमध्ये होणारा लोकशाही दिन, सोमवारी (दि. ६) प्रत्यक्षात न होता दूरचित्रवाणी (व्हिडिओ कॉन्फरन्स)च्या माध्यमातून दुपारी १ ते २ या वेळेत होणार आहे.
लोकशाही दिनाकरीता संबंधित तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहून दूरचित्रवाणी (व्हिडिओ कॉन्फरन्स)द्वारे लोकशाही दिनात सहभागी होता येईल. नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात. अर्जदार यांनी विहीत नमुन्यातील अर्ज १५ दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत. विहीत नमुन्यामध्ये तसेच विहीत मुदतीत प्राप्त न झालेले अर्ज जिल्हा लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत.