शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीकर जिल्हा प्रशासनाचे हे आवाहन पाळणार का? एकजुटीने कर्तव्य बजावतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 13:25 IST

रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने चार रूग्ण आढळले असून, या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आलेले होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना तत्काळ निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. ते अन्य कोणाच्याही संपर्कात आलेले नसून कोणीही घाबरून जाऊ नये. ग्रामीण भागात कोरोनाबाधित रूग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे फेसबुक लाईव्हनागरिकांच्या प्रश्नांना दिली उत्तर-- शिथिलतेचा गैरफायदा घेऊ नकाकोरोनाविरूद्धचा लढा एकजुटीने लढण्याचे आवाहन

रत्नागिरी : शिथिलतेचा अतिरेक किंवा गैरफायदा नागरिकांनी घेऊ नये. शिथिलतेमुळे काही अडचणी निर्माण झाल्यास ही शिथिलता बंद होऊ शकते. सोशल डिस्टन्सिंगचे किमान बंधन प्रत्येकाने पाळले पाहिजे. ऑरेंज झोनमधून रेडझोनमध्ये जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, कोरोनाविरूद्धचा लढा एकजुटीने लढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे यांनी केले आहे.रत्नागिरी जिल्ह्यात विविध कारणांमुळे अडकलेल्या लोकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी व जिल्हा बाहेरील लोकांना जिल्ह्यात येण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे उपस्थित होते. तब्बल २ हजार लोकांनी जिल्हा प्रशासनाचे फेसबुक लाईव्ह पाहिले. ८० लोकांनी पेज शेअर केले असून, ३५० लोकांनी प्रशासनाला प्रश्न विचारले.यावेळी त्यांनी सांगितले की, बाहेरून येणाऱ्यांचे स्वागत करा. रेडझोनमधून येऊ शकतो का? या प्रश्नावर जिल्हाधिकारी मिश्रा यांनी रेडझोनमधून कोणीही येऊ शकणार नसल्याचे सांगितले. कंटेनमेंट झोनच्या बाहेर असाल तर जवळच्या पोलीस स्थानकाकडे अर्ज करावा. त्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन परवानगी देण्याबाबत विचार होईल, असे सांगितले.कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली असेल किंवा हॉटस्पॉटमध्ये व्यक्ती जाऊन आलेली असेल अशा लोकांना क्वॉरंटाईन होणे आवश्यक आहे, अशी माहिती कान्हुराज बघाटे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडूच नयेत, असे स्पष्ट संकेत शासनाचे आहेत. त्यांना जास्त धोका आहे, त्यांनी घराबाहेर पडू नये, असे पोलीस अधीक्षक मुंढे यांनी सांगितले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. पाचपेक्षा जास्त लोक एकत्र राहता कामा नयेत. योग्यत्या सर्वप्रकारच्या काळजी घेऊन सर्व आस्थापनांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्याचे पालन करावे, असे पोलीस अधीक्षक मुंढे यांनी सांगितले.ज्या लोकांना बाहेरून रत्नागिरीत यायचे असेल तर पास घेणे अनिवार्य आहे. प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन वर्गीकरण करेल त्यानुसार नियोजन केले जाईल. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू, असेही सांगण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने चार रूग्ण आढळले असून, या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आलेले होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना तत्काळ निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. ते अन्य कोणाच्याही संपर्कात आलेले नसून कोणीही घाबरून जाऊ नये. ग्रामीण भागात कोरोनाबाधित रूग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारी