शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत 1,257 श्वानांचे निर्बिजीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 13:15 IST

रत्नागिरी नगर परिषद आणि 'व्हेटस् फॉर अ‍ॅनिमल्स' कराड यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण व अॅन्टी रॅबिज लसीकरण मोहीम सुरू आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषद आणि 'व्हेटस् फॉर अ‍ॅनिमल्स' कराड यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण व अॅन्टी रॅबिज लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत 1257 श्वान पकडून त्याचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत झालेल्या मोहिमेत एकाच दिवसात तब्बल 31 श्वानांचे निर्बिजीकरण व अॅन्टी रॅबिज लसीकरण करण्यात आल्याची माहिती 'व्हेटस् फॉर अ‍ॅनिमल्स' कराडचे मॅनेजर सचिन देऊळकर यांनी ‘लोकमत’शी दिली. रत्नागिरी शहरात श्वानांचे प्रमाण वाढले आहे. या श्वानांकडून वाहनांचा पाठलाग करणे, पादचा-यांना चावणे अशा घटना घडत आहेत. नागरिकांमधून होणा-या तक्रारींची दखल घेत रत्नागिरी नगर परिषदेने श्वानांचे निर्बिजीकरण आणि अॅन्टी रॅबिज लसीकरण मोहिमेला 8 नोव्हेंबर 2017 पासून सुरुवात केली.

नगर परिषद रत्नागिरी आणि 'व्हेटस् फॉर अ‍ॅनिमल्स' कराड यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण व अॅन्टी रॅबिज लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला श्वानांची संख्या जास्त होती. मात्र, त्यानंतर श्वान मिळण्याचे प्रमाण कमी होत चालले.श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण डॉ. सचिन ढालकर हे करतात. शहरातील नगर परिषद शाळा नं. 2 या ठिकाणी शाळेतीलच तीन-चार खोल्या घेऊन तेथे हा उपक्रम राबवला जातो. ज्या श्वानांवर हे उपचार केले जातात. त्या श्वानांचा उजवा कान ‘व्ही’ आकारात वरच्या बाजूला कापला जातो. त्यावरुन पुन्हा ते श्वान दिसताच त्याच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया झाली आहे असे समजते.

त्याच ठिकाणी सोडतातया निर्बिजीकरणासाठी ज्या ठिकाणाहून श्वानांना पकडले जाते, निर्बिजीकरण आणि लसीकरण केल्यावर त्यांना त्याच ठिकाणी पुन्हा सोडण्यात येते. यासाठी सुमारे तीन दिवसांचा कालावधी लागतो. आतापर्यंत 1257 श्वान पकडल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. ही मोहीम अशीच चालू राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी