शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बहुमत असूनही शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर-अस्वस्थ, खासदार सुनील तटकरेंनी लगावला टोला

By अरुण आडिवरेकर | Updated: November 15, 2022 17:55 IST

महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच पहिल्यांदाच एवढी अस्थिरता पाहायला मिळते आहे

रत्नागिरी : राज्यातील सरकारची अस्थिरतेकडे वाटचाल सुरु आहे. बहुमत असूनही हे सरकार अस्थिर आणि अस्वस्थ आहे. ज्यावेळी अस्थिरतेकडे वाटचाल होते, त्यावेळी पुढचे पाऊल हे मध्यावधी निवडणुका असू शकते. महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच पहिल्यांदाच एवढी अस्थिरता पाहायला मिळते आहे, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडले.दिशा समितीच्या बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे आज, मंगळवारी (दि.१५) रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमदार जितेंद्र आव्हाड हे गेली अनेक वर्षे सक्रिय राजकारणात आहेत. शरद पवारांच्या पुरोगामी विचारांचा पगडा त्यांच्या मनावर आहे. पोलिसांमार्फत जो काही प्रकार झाला तो दुर्दैवी आणि निषेधार्ह असाच आहे. विरोधी पक्षातील सक्षम नेत्यावर अशाप्रकारची कारवाई करणे म्हणजे सरकारच्या अस्थिरतेबाबत त्यांच्याच मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. म्हणूनच अशाप्रकरची आकसाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप खासदार तटकरे यांनी केला. सरकारने याबाबत फेरविचार करावा, असेही ते म्हणाले.मंत्री सत्तारांवर यापेक्षा कडक कारवाई झाली पाहिजेराजकारणात आणि समाजकारणात मतमतांतर असू शकतात. प्रत्येकाची राजकीय विचारसरणी भिन्न असू शकते. संविधानाच्या माध्यमातून विरोधी पक्ष सक्षम असलाच पाहिजे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेला नाही. आपले विचार मांडण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. ज्यापद्धतीने गुन्हा नोंदविण्याची तत्परता दाखविण्यात आली. त्याउलट खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत अश्लिल, हीन शब्दामध्ये राज्याच्या एका विद्यमान मंत्र्याने काढलेले उद्गार महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. खरंतर कारवाई व्हायचीच असेल तर यापेक्षाही कडक कारवाई अब्दुल सत्तार यांच्यावर झाली पाहिजे, असे खासदार तटकरे म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsunil tatkareसुनील तटकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस