शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्रामुळे शाब्दिक चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 17:31 IST

नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे निवडणूक विभागाने जाहीर केल्यामुळे अर्ज भरण्याच्या ठिकाणी उमेदवार व निवडणूक विभागाचे अधिकारी अविशकुमार सोनाने यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. निडणूक निर्णय अधिकारी सोनाने यांना पत्रकारांनी विचारणा केली असता, आपण निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देदेवरूख नगरपंचायत निवडणुकजातवैधता प्रमाणपत्रामुळे शाब्दिक चकमकनिवडणूक विभागाकडून मार्गदर्शन मागवले

देवरूख : नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे निवडणूक विभागाने जाहीर केल्यामुळे देवरूखच्या सभागृहात अर्ज भरण्याच्या ठिकाणी उमेदवार व निवडणूक विभागाचे अधिकारी अविशकुमार सोनाने यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. निडणूक निर्णय अधिकारी सोनाने यांना पत्रकारांनी विचारणा केली असता, आपण निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविल्याचे त्यांनी सांगितले.निवडणूक अर्ज दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे, अशा सूचना सभागृहात देण्यात आल्या आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार, त्यांचे सहकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात याच मुद्द्यावरून बराच वेळ चर्चा झाली. यातून काही निष्पन्न होत नसल्यामुळे संभ्रमावस्था खूप वेळ ताणली गेली.

अखेर पत्रकारांनी पुढाकार घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी सोनाने यांना तांत्रिक मुद्द्याबद्दल विचारणा केली. यावर सोनाने यांनी निवडणूक विभागाचे आदेश सांगितले. आपण त्याचे पालन करीत आहोत.

नगराध्यक्षपदाच्या काही उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र ३ वाजेपर्यंत जोडलेले नाही, यामुळे याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागवले असून, हे प्रमाणपत्र जोडण्यासाठी छाननी दिनी मुदत मिळते का? हे या मार्गदर्शनातून स्पष्ट होणार आहे. मात्र, ज्यांनी सोमवारी जातवैधता प्रमाणपत्र जोडलेले नाही, अशा उमेदवारांची रात्र चिंताक्रांत अवस्थेत जाणार आहे.अंतिम दिवसापर्यंत दाखल झालेल्या अर्जांमध्ये शिवसेनेकडून १७ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान भाजपमध्ये काही दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या अनघा कांगणे यांना भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे.नगराध्यक्षपद उमेदवारनगराध्यक्षपदासाठी काँग्रेस आघाडीकडून स्मिता लाड, स्वाभिमान पक्षाकडून मिताली तळेकर, भाजप युतीकडून मृणाल शेट्ये व अपक्ष म्हणून अनघा कांगणे यांनी अर्ज दाखल केले. देवरूख नगराध्यक्ष निवडणुकीसाठी एकूण पाच अर्ज दाखल करण्यात आले आहेत.उमेदवारांत संभ्रमावस्थाअर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी अविशकुमार सोनाने यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी जातवैधता प्रमाणपत्र अर्ज भरण्याच्या मुदतीत जोडण्यात यावेत, असे जाहीर केले. आयत्या वेळी हा निर्णय जाहीर केल्याने सर्वच उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक