हमी भावाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:32 AM2021-04-09T04:32:44+5:302021-04-09T04:32:44+5:30

रत्नागिरी : आंबा व काजू उत्पादनांना हमीभाव देऊन उत्पादीत माल शासनाने उत्पादकांकडून खरेदी करावा, अशी मागणी महाराष्ट्र समविचार मंचाकडून ...

Demand for a guaranteed price | हमी भावाची मागणी

हमी भावाची मागणी

Next

रत्नागिरी : आंबा व काजू उत्पादनांना हमीभाव देऊन उत्पादीत माल शासनाने उत्पादकांकडून खरेदी करावा, अशी मागणी महाराष्ट्र समविचार मंचाकडून करण्यात आली आहे. शासनाने एकरी नुकसानाचा तपशील न करता, गुंठ्यावर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ओम शिंदे यांची निवड

खेड : येथील उदयोन्मुख खेळाडू ओम शिंदे याची आंतरराष्ट्रीय फाईट स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. श्रीनगर (काश्मीर) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये १४ ते १७ वर्ष वयोगटात ७० ते ७५ वजनी गटामध्ये सर्वोत्कृष्ट फाईट तरुण नैपुण्य त्याने मिळवले आहे. इंडोनेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे.

खाद्यपदार्थ स्पर्धा

चिपळूण : येथील रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टुरिझम महाविद्यालयात डेझर्ट व सॅण्डविच मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना चाचणी आवश्यक

रत्नागिरी : दहावी, बारावी परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी ४८ तासांसाठी वैध राहणार आहे. त्यामुळे शिक्षकांना दर दोन दिवसांनी रुग्णालयामध्ये जाऊन तपासणी करावी लागणार आहे. दिनांक २३ व २९ एप्रिलपासून दहावी - बारावीच्या परीक्षा सुरु होत आहेत.

गटारांची कामे सुरु

देवरुख : शहरातील रस्ते चांगले राहून पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी गटार बांधणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. शहरात चार ठिकाणी गटारांची कामे सुरु आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारे बांधण्यात येत आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन रस्ते सुरक्षित राहणार आहेत.

चालकावर गुन्हा

दापोली : उटंबर केळशीकडून मुंबईकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीचा रावतोली येथे झाडावर आदळून अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. मात्र, त्यानंतर त्याची चौकशी करुन नियमान्वये नोटीस बजावून सोडून देण्यात आले आहे.

मुख्यालय न सोडण्याचे आदेश

रत्नागिरी : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक ३० एप्रिलपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळा बंद राहणार असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश असून, शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टँकरला मागणी

रत्नागिरी : शहरामध्ये गेले दोन दिवस पाणीपुरवठा झाला नाही. शिवाय बुधवारी काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने गेले दोन दिवस टँकरला वाढती मागणी आहे. खासगी टँकरसाठी आधी बुकिंग करावे लागत आहे. कित्येक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तर दररोज टँकर मागवावा लागत आहे.

Web Title: Demand for a guaranteed price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.