शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण तालुकाध्यक्ष हटवण्याची मागणी

By admin | Updated: September 11, 2014 00:09 IST

माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांना दिले निवेदन

चिपळूण : येथील तालुकाध्यक्षांच्या नेतृत्त्वाखाली काम करणे अवघड झाल्याने त्यांना बदलावे, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे केली आहे. काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचा मनमानीपणा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणे सर्वांनाच असह्य आहे. तालुकाध्यक्षपद मिळाल्यापासून पक्षाची व पदाची ध्येयधोरणे बाजूला सारुन निव्वळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सर्वसामान्यांना आणि मतदारांना अडचणीचे ठरेल, अशाच प्रकारची आंदोलने करणे, निव्वळ राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्याच कार्यकर्त्यांविरुद्ध बोलत राहाणे, शिवसेना व विरोधी पक्षाबाबत अवाक्षरही न काढणे, सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कामे देणे, काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध षडयंत्र रचणे, एकाधिकारशाही करणे, कमिटी बॅनरवर दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तीचा फोटो लावून निव्वळ प्रगतीपुस्तक भरण्याचे काम करणे, सतत पक्षविरोधी कारवाया करणे, कामे देतो, सांगून पैसे उकळणे, कार्यकर्त्यांना धमकावणे, पक्षवाढीचा देखावा उभा करुन वाळू व्यावसायिक, कारखानदार, सरकारी कर्मचारी यांच्याकडून रक्कम घेणे, स्वार्थ साधणे, राणे यांच्याबद्दल खोटेनाटे सांगून कार्यकर्त्यांना दूर ठेवणे, गैरसमज पसरवणे, खोटी आमिषे दखवून कार्यक्रमासाठी उपस्थिती वाढविणे, इतर पदाधिकाऱ्यांनी घेतलेले कार्यक्रम अयशस्वी होतील, अशा कारवाया करणे अशा अनेक गोष्टी काँग्रेस श्रेष्ठींनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये सावंत यांनी ठराविक गावे सोडता कुठेही बूथ लावले नाहीत. अनेक गावात पक्षाचे बूथ अध्यक्षच नाहीत, ते केवळ कागदावर आहेत. गावागावातील वाडीवस्तीवरील मतदारांपर्यंत ते पोहचले नाहीत. साधे प्रचारपत्रही पोहोचले नाही. कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतले नाही. अनेक ठिकाणी बूथच्या खर्चाची रक्कमही पोहचली नाही, अशा अनेक तक्रारी या निवेदनात आहेत. या पत्रावर लक्ष्मण खेतले, शहराध्यक्ष परिमल भोसले, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. शांताराम बुरटे, माजी नगराध्यक्ष हेमलता बुरटे, माजी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. जीवन रेळेकर, माजी उपनगराध्यक्ष गौरी रेळेकर, जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, युवक अध्यक्ष वैभव वीरकर, तालुका सरचिटणीस राजेंद्र शिंदे, सचिव राजेश वाजे, पाणी सभापती कबीर काद्री आदी १६० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)पक्षवाढीसाठी कोणताही कार्यक्रम न करता केवळ पदाधिकाऱ्यांना दुखावण्याचे काम त्यांनी केले. अपमान सहन करुन केवळ आपल्याकडे पाहून आम्ही प्रामाणिकपणे काम करीत राहिलो. आपल्या पराभवाचे शल्य आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. याची अनेक कारणे असतील. मात्र, तालुकाध्यक्षांचा हेकेखोरपणा हेही मोठे कारण आहे. काँग्रेसचे अस्तित्त्व तालुक्यात नव्हते. त्या कठीण काळात आपण काँग्रेसरुपी आंब्याचे झाड लावले. आता हे झाड मोठे झाले आहे. त्यावर फळे लागल्याने दगड मारण्याचे काम सुरु झाले आहे. त्याला आपण फारशी किंमत देत नाही, असे प्रकार यापूर्वीही घडले असून, आपला पक्षश्रेष्ठींवर विश्वास आहे, असे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी सांगितले. माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांना दिले निवेदन. तालुकाध्यक्षांच्या नेतृत्त्वाखाली काम करणे असह्य. तालुकाध्यक्षांच्या धाकदपटशहाचा वाचला पाढा.