शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

अन्य राज्यातील पदवी नाकारली..!

By admin | Updated: March 25, 2015 00:44 IST

नर्स भरती : सुमारे दोनशे उमेदवारांवर अन्याय

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबईतर्फे सरळसेवेने स्टाफ नर्स भरती घेण्यात आली. मात्र, या भरतीवेळी अन्य राज्यात नर्सिंग कोर्स केलेल्या मराठी उमेदवारांना शासकीय उमेदवार अपात्र ठरवण्यात आले आहे. सुमारे दोनशे उमेदवारांना यामुळे नोकरीपासून वंचित राहवे लागणार आहे.महाराष्ट्रात जन्मलेले, शिवाय दहावी, बारावीचे शिक्षण महाराष्ट्रात घेतलेले, ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी दाखलाही आहे, अशा उमेदवारांनासुध्दा केवळ अन्य राज्यात इंडियन नर्सिंग, दिल्ली मान्यताप्राप्त असलेल्या शिक्षण संस्थेत शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, मुंबईचे मान्यता प्रमाणपत्र असतानादेखील अपात्र ठरवून भूमीपूत्रांवरच अन्याय करण्यात येत आहे, अशी कैफियत या उमेदवारांकडून मांडण्यात आली.महाराष्ट्र शासन संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्यामार्फत सरळसेवेने स्टाफ नर्स भरती परीक्षा घेण्यात आली होती. १४८९ रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. अन्य राज्यात नर्सिंगचे शिक्षण घेतलेले २० महाराष्ट्रीयन उमेदवार परीक्षेस बसले होते. भरतीच्या अनुषंगाने उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणी व प्राधान्यक्रम भरण्यासाठी दि. १० ते १५ मार्च अखेर विविध केंद्रावर बोलावण्यात आले होते. मात्र प्रमाणपत्र पडताळणी दरम्यान इतर राज्यामध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र प्रमाणपत्र पडताळणी दरम्यान इतर राज्यामध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले. उमेदवारांनी अपात्रतेचे कारण विचारले असता, तुम्ही नर्सिगचा कोर्स अन्य राज्यातून केला असल्याचे सांगून शासकीय सेवेतून अपात्र ठरविण्यात आले आहेत.विशेष म्हणजे ज्यावेळी अर्ज भरण्यात आला, त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला पदवीचे नाव लिहीण्यास सांगितले. बाकीचे नंतर बघू, असे सांगितल्याने अनेकांनी अर्ज भरल्याचे या उमेदवारांनी सांगितले. मात्र आता अनेक उमेदवारांची पहिल्याच परिक्षेत वणीं लागल्याने हा नवीन नियम लागू करण्यात आल्याचा आरोप रत्नागिरीतील उमेदवारांनी केला आहे. (प्रतिनिधी)उच्च न्यायालयात धावआपल्याकडे कर्नाटकमधील पदवी असतानाही आपल्याला या भरतीमध्ये डावलण्यात येत असल्याने याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतल्याचेही उमेदवारांनी सांगितले. ही पदवी असल्याने नोकरभरतीत नाकारण्याचा कोणताही नियम नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.