कोरोना रुग्णांमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:19+5:302021-07-14T04:37:19+5:30

लांजा : गेले दोन दिवस कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. मंगळवारी कोरोनाचे एकूण २१ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून ...

Decrease in corona patients | कोरोना रुग्णांमध्ये घट

कोरोना रुग्णांमध्ये घट

Next

लांजा : गेले दोन दिवस कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. मंगळवारी कोरोनाचे एकूण २१ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोना रुग्णांमध्ये गेली दोन दिवस घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. मंगळवारी करण्यात आलेल्या अँटिजन कोरोना चाचणीत १२ जण तर आरटीपीसीआर अहवालात ७ जण तसेच शहरामध्ये फिरणाऱ्या नागरिकांचे दि. ११ जुलै रोजी कोरोना स्वॅब घेण्यात आले होते. त्यामधून आरटीपीसीआर २ जण असे एकूण २१ जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यामध्ये प्रभानवल्ली ऐरडववाडीतील सहा, खेरवसे बौद्धवाडीतील चार, मोगरगाव कडा टेमकरवाडीतील तीन, कुरंग, कोंडगे, धुंदरे, लांजा कनावजेवाडी, लांजा देवराई, देवधे माळवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तालुक्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ३,५५२ झाली आहे. त्यातील ३,२४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात १९३ कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Decrease in corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.