शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : पडवे येथे गोवर रुबेला लसीकरण मोहीमेला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:45 IST

संपूर्ण महाराष्ट्रात  दिनांक २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत पडवे (ता. गुहागर) येथे सत्र आयोजित करण्यात आले होते. परंतु येथे या मोहीमेत एक दोन लाभार्थी वगळता प्रतिसाद मिळाला नाही.

ठळक मुद्देपडवे येथे गोवर रुबेला लसीकरण मोहीमेला नकारपरत एकदा लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार

आबलोली : संपूर्ण महाराष्ट्रात  दिनांक २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत पडवे (ता. गुहागर) येथे सत्र आयोजित करण्यात आले होते. परंतु येथे या मोहीमेत एक दोन लाभार्थी वगळता प्रतिसाद मिळाला नाही.

मोहीमेपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांनी पडवे उर्दू शाळेत पालकासाठी संवाद सभा घेऊन मार्गदर्शन केले होते. शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला होता. तरी पडवे येथील ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली आयोजित लसीकरण सत्रास प्रतिसाद दिला नाही.व्हॉटस्अ‍ॅप व फेसबुकवरील चुकीचे संदेश, अफवांमुळे ग्रामस्थांच्या मनात गैरसमज, साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच ग्रामस्थांनी लसीकरणास प्रतिसाद दिला नाही. परिणामी लसीकरण उद्दीष्टपूर्ती होण्यात अडचण येत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली अंतर्गत आतापर्यंत ८६ ते ८७ टक्के लाभार्थीना लस टोचण्यात आली आहे. पडवे, तवसाळ - काताळे येथील उर्दू शाळेतील लाभार्थी पूर्ण झाल्यास १०० टक्के काम पूर्ण होईल. या गावात परत एकदा पालक संवाद सभा घेऊन पालकांच्या शंका निरसन करण्यात येईल व परत एकदा लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

गोवर - रुबेला या जीवघेण्या आजारापासून रक्षण करणारी आहे. देशाबाहेर कामासाठी नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांना ही लस घेतलेल्यांचे प्रमाणपत्र कामी येणार आहे म्हणून लसीकरण सत्रात अडथळा निर्माण न करता नागरिकांनी सहकार्य करावे.- डॉ. जी. पी. जांगीड,वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोळवली.

टॅग्स :Healthआरोग्यRatnagiriरत्नागिरी