शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

देवरुखातील आठवडा बाजारात व्यापाऱ्यांकडून फसवणूक, व्यापाऱ्याला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 11:05 IST

देवरूख : शहरात आठवडा बाजारात विक्री करीता येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून गोरगरिब ग्राहकांची वजनात फसवणुक केली जाते हा प्रकार रविवारी पुन्हा एकदा ...

ठळक मुद्देदेवरुखातील आठवडा बाजारात व्यापाऱ्यांकडून फसवणूकव्यापाऱ्याला चोप : वस्तूच्या वजनात चक्क अर्धा किलोची तफावत

देवरूख : शहरात आठवडा बाजारात विक्री करीता येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून गोरगरिब ग्राहकांची वजनात फसवणुक केली जाते हा प्रकार रविवारी पुन्हा एकदा उघडकीस आला. प्रत्येक वस्तुच्या वजनात तब्बल अर्धा किलोची तफावत आढळून आली आहे. ही बाब स्थानिक व्यापारी, नागरिकांच्या लक्षात येताच फसवणुक करणाऱ्या व्यापाऱ्यांना स्थानिकांनी चांगलाच चोप दिला. या प्रकाराबाबत कोठेही तक्रार करण्यात आलेली नसल्याचे पुढे आले आहे.देवरूख खालची आळी परिसरात दर रविवारी आठवडा बाजार भरतो. घाटमाथ्यावरून भाजीपाला, फळ विक्रेते, कपडे, मसालेवाले, शीतपेयवाले आदी विविध वस्तुंचे व्यापारी दाखल होतात.

या आठवडा बाजारात तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील ग्रामस्थ खरेदीसाठी येतात. या व्यापाऱ्यांकडून वजनकाट्याद्वारे ग्राहकांची फसवणुक करण्याचा प्रकार यापुर्वी अनेक वेळा घडला होता. यावेळी स्थानिक व्यापारी, नागरिकांनी आवाज उठविल्यामुळे व नगरपंचायतीच्या पुढाकाराने या व्यापाऱ्यांवर कटाक्षाने लक्ष ठेवण्यात आले होते. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकाराला काही अंशी आळा बसला होता.फसवणुकीचा हा प्रकार थांबलेला असताना रविवारी पुन्हा एकदा आठवडा बाजारातील मसाले विक्रेत्याने महिलांंची वजन काट्याद्वारे फसवणुक केली. महिलांच्या गर्दीचा फायदा या व्यापाऱ्याने घेतला. धने व खोबरे खरेदीत तब्बल अर्धा किलोची घट असल्याचे उघड झाले.यानंतर त्या ग्राहकांनी स्थानिक व्यापाऱ्यांकडे सदर वस्तुंचे वजन केल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. स्थानिक नागरिकांसह व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सावंत, हनिफ हरचिरकर, राजन शेट्ये, विकास जागुष्टे, उदय बेर्डे आदींनी सदर व्यापाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले.ग्राहकांच्या फसणुकीचे प्रकार थांबणे गरजेचे आहे. याकडे देवरूख नगरपंचायतीने कटाक्षाने लक्ष द्यावे. जे व्यापारी ग्राहकांची फसवणुक करतील अशा व्यापाऱ्यांना बाजारात पुन्हा थारा देता कामा नये तसेच फसवणुक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी ग्राहक व नागरिकांमधून होत आहे.

याबाबत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सावंत म्हणाले की, फसणुकीचा प्रकार हा चुकीचा आहे. याकडे देवरूख नगरपंचायतीने लक्ष द्यावे. तसेच वजन माप तपासणी मोहिम आठवडा बाजारात राबविणे गरजेचे आहे तसेच ग्राहकांनी जागरूक राहणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

टॅग्स :consumerग्राहकRatnagiriरत्नागिरी