राजापुरात एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, आगार प्रमुखांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 07:46 PM2021-12-23T19:46:01+5:302021-12-23T19:46:18+5:30

राजापूर आगारातील चालक कम वाहक राकेश रमेश बांते यांच्या मृत्यूनंतर एसटी कर्मचारी व त्यांच्या पत्नीने आक्रमक पवित्रा घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

Death of ST employee in Rajapur demand to file a case of homicide against depot chief | राजापुरात एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, आगार प्रमुखांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

राजापुरात एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, आगार प्रमुखांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next

राजापूर : राजापूर आगारातील चालक कम वाहक राकेश रमेश बांते यांच्या मृत्यूनंतर एसटी कर्मचारी व पत्नीने आक्रमक पवित्रा घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी आगार प्रमुखांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्नी भाग्यश्री बांते यांनी केली आहे.

तर बांते यांच्या पत्नी व दोन्ही मुलांच्या संगोपनाबाबत प्रशासनाने ठोस आश्वासन द्यावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.  राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांना हे निवेदन देण्यात आले.

राकेश बातें राजापूर आगार येथे कार्यरत होते. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात तेही सहभागी होते. यामुळे त्याचेवर आगार व्यवस्थापक राजापूर यांनी निलंबनाची कारवाई केलेली होती. तेव्हापासून ते मानसिक दडपणाखाली होते.

त्यामुळे माझ्या पतीच्या मृत्युस राजापूर आगार व्यवस्थापक हेच जबाबदार असून त्यांचेवर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी बातें यांच्या पत्नीने केली आहे. या तक्रारीसोबत पतीचा शवविच्छेदन अहवाल जोडत असल्याचे निवेदनात नमुद केले आहे. 

Web Title: Death of ST employee in Rajapur demand to file a case of homicide against depot chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.