शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील मंडणगडात आढळलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 11:57 IST

मंडणगड : मोठ्या कालावधीनंतर जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पाल्ये गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा रुग्ण वयोवृद्ध असून, ...

मंडणगड : मोठ्या कालावधीनंतर जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पाल्ये गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा रुग्ण वयोवृद्ध असून, या रुग्णाचा मंगळवारी (२७ डिसेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे. कोरोनाचा पुन्हा शिरकाव होत असतानाच तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. तालुक्यात बसविण्यात आलेला ऑक्सिजन प्लांट अद्याप सुरूच झालेला नाही.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा इतिहास पाहता त्याला दम्याचा आजार होता. तसेच हा रुग्ण तीन वर्षे मंडणगडमध्येच वास्तव्याला होता. हा रुग्ण नेहमीप्रमाणे रुग्णालयात तपासणीकरिता गेला असता डॉक्टरांना कोरोनाची काही लक्षणे दिसली. त्यांनी त्याची कोरोना तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्याला तत्काळ दापोली येथे पाठवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुग्णाच्या सहवासातील इतर कोणालाही कोणतीच लक्षणे नसून, नागरिकांना घाबरण्याचे कोणतेच कारण नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.कोरोनाच्या लढ्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. कोरोना रुग्णांवरील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे रिक्त असून, केवळ एक डॉक्टर सेवेत आहे. सध्या दापोलीच्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार आहे.ऑक्सिजन प्लांट शोभेसाठीचतिसऱ्या लाटेच्या अखेरच्या टप्प्यात ऑक्सिजन प्लांट बसविण्यात आला होता. मात्र, तो अद्याप सुरू केलेला नाही. कोरोनाचा धोका घोंगावत असताना तालुक्यातील आरोग्य यंत्रणा मात्र कोलमडलेल्या स्थितीत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्या