शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी
2
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
3
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
4
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
5
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
6
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
7
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
8
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
9
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
10
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
11
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
12
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
13
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
14
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
15
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
16
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
17
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
18
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
19
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
20
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?

वीज वाहिन्या की मृत्यूसापळा

By admin | Updated: August 1, 2014 23:20 IST

संगमेश्वर तालुका : महावितरणचा कारभार, ग्राहकांच्या जिवाचा होतोय खेळ

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्या धोकादायक बनल्या आहेत. गेल्या महिनाभरात तीनवेळा वीज वाहिनी तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. त्यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्यांना आपल्या डोक्यावरुन जाणारी महावितरणची वीज वाहिनी म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळा भासत आहे.महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना सुविधा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. वीजबिल वसुली मात्र कायद्याचा बडगा दाखवून केली जात आहे. सध्या झालेल्या आॅनलाईन तक्रार सुविधेमुळे महावितरणचे काम सुलभ झाले असले तरी ग्रामीण भागातील ग्राहकांना मात्र या जाचक सुविधेमुळे आठ ते दहा दिवस अंधारात राहावे लागत आहे. तक्रारवही गायब झाल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. पावसाळी हंगाम असल्याने आणि वीज लाईनभोवती वाढलेल्या झाडीची साफसफाई न झाल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या तक्रारीतही वाढ झाली आहे. कडवई परिसरातही गेले काही दिवस वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या सततच्या वीज पुरवठा खंडित होण्याने अनेक ठिकाणी वीज उपकरणे निकामी होत आहेत.कडवई आणि पंचक्रोशीला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या अनेक वर्षांपूर्वीच्या असून, महावितरण कंपनीकडून त्या बदलणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी अशाच काही ठिकाणी वीज वाहिन्या तुटून अपघात घडले होते. चालू वीज वाहिनी पडून विनायक मयेकर यांच्या रिक्षेचे नुकसान झाले होते. या रिक्षाचालकालाही महावितरणने मदतीचा हात पुढे केला नाही. कडवई बाजारपेठ येथे तर या वाहिन्यांचे धोकादायक जाळे दिसून येते. या वाहिन्यांखालचे सुरक्षा गार्डही काही ठिकाणी गंजून लोंबकळत असताना दिसून येतात. गेल्या पंधरा दिवसात कडवईतील अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटून रस्त्यावर पडण्याचे प्रकार वाढले आहेत. महावितरणला माहिती मिळेपर्यंत या वाहिन्यांमधून प्रवाह चालू असतो. अशावेळी गंभीर अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. समर्थनगर येथे एकाच ठिकाणी वीज वाहिनी तुटून रस्त्यावर पडण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. अपघात होता होता एक रिक्षाचालक बालंबाल बचावला. महावितरण कंपनी सोयीसुविधांना प्राधान्य देणार का? महावितरण सर्वच गोष्टी ग्राहकांकडून खरेदी करुन घेत आहे. खराब झालेल्या वाहिन्याही ग्राहकांच्या पैशातून बदलल्या जात आहेत. मग वीजबिलात आकारले जाणारे विविध अधिभार आणि अनामत रक्कम कुणाच्या खिशात जातात, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. (वार्ताहर)